आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहरा मोहब्बतला निघालेली मालगाडी धावली विनाचालक, 9 वाघिनी रुळावरुन घसरल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनेनंतर मालगाडीला वॉशिंग लाइनच्या बाजूला टाकण्यात आले - Divya Marathi
घटनेनंतर मालगाडीला वॉशिंग लाइनच्या बाजूला टाकण्यात आले
मुरादाबाद - येथील हरथला रेल्वस्टेशनवर बुधवारी उशिरा रात्री एकच गोंधळ उडाला. एक मालगाडी विना चालक पाच किलोमीटर धावली आणि मुरादाबाद स्टेशनवर पोहचली. येथे तिला अनेक क्लृप्त्या करुन थांबवण्यात यश आले मात्र या प्रयत्नात नऊ वाघिनी (वॅगन) रुळावरुन घसरल्या. रेल्वेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक माहितीनूसार मालगाडीचे ब्रेक खराब झाल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले गेले आहे.

काय आहे प्रकरण
विनाचालक धावलेल्या मालगाडीत कोळसा होता. झारखंडहून पंजाबातील लहरा मोहब्बत येथे कोळसा नेला जात होता. बुधवारी सायंकाळी जेव्हा मालगाडी जेव्हा हरथला स्टेशनमध्ये पोहोचली तेव्हा तिचे इंजिन फेल झाले. रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या इंजिनाची व्यवस्था झाली नाही, याची माहिती स्टेशन मास्तरला देऊन मालगाडीचा चालक रवाना झाला. त्यानंतर काही वेळाने मालगाडी उलट दिशेने धावू लागली. यामुळे रेल्वे प्रशासनाची झोप उडाली आणि त्यांनी तिला थांबवण्याचे प्रयत्न सुरु केले. मुरादाबाद येथे गाडी थांबवण्यात प्रशासनाला यश आले. मात्र तोपर्यंत नऊ वाघिनी रेल्वेरुळावरुन उतरल्या होत्या आणि रुळांचे मोठे नुकसान झाले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...