आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्भयाच्या आईने मानले राहुल गांधींचे आभार, म्हणाल्या \'तुमच्यामुळेच माझा मुलगा पायलट बनला\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 2012 मध्ये राजधानी दिल्लीमध्ये जालेल्या निर्भया गँगरेप केसने संपूर्ण देशाला हादरा दिला होता. त्याच निर्भयाचा भाऊ पायलट बनला आहे. निर्भयाची आई आशादेवी यांनी यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानले आहेत. आशादेवी म्हणाल्या, निर्भयाचा भाऊ आज पायलट बनू शकला याचे संपूर्ण श्रेय राहुल गांधींनाच जाते.  

एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आशादेवींनी सांगितले की, बलात्कार प्रकरणानंतर त्यांचे कुटुंब पूर्णपणे खचले होते. निर्भयाच्या भावावरही त्याचा परिणाम झाला. पण त्याने पुढील काळात अभ्यासावर आणि ध्येयावर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. आशादेवींनी सांगितले की, राहुल गांधींनी निर्भयाच्या भावाच्या शिक्षणाचा खर्च तर उचललाच पण त्याचबरोबर नेहमी त्याला फोन करून त्याचे प्रोत्साहनही वाढवले. 

राहुल गांधींनी सतत निर्भयाच्या भावाला फोन करून प्रोत्साहन दिले आणि ध्येयावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देत राहिले असेही निर्भयाच्या आईने सांगितले. राहुल गांधींना जेव्हा समजले की, त्याला लष्करात जाण्याची इच्छा आहे, त्यावेळी त्याने शिक्षण संपल्यानंतर पायलटचे प्रशिक्षण घ्यावे असा सल्ला त्यांनी दिला. निर्भयाबरोबर ती घटना घडली तेव्हा, तिचा भाऊ 12 व्या वर्गात शिकत होता. 

2013 मध्ये परीक्षा दिल्यानंतर निर्भयाच्या भावाने रायबरेलीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डान अॅकेडमीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर ते रायबरेलीला शिफ्ट झाले. त्याला त्याठिकाणी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण तरीही तो मागे हटला नाही. त्याने 18 महिन्यांच्या ट्रेनिंगदरम्यान सतत निर्भया केसशी संबंधित माहिती घेतली. त्यावेळी राहुल त्याच्याशी फोनवर बोलायचे आणि माघार घेऊ नको असे सतत सांगत होते. 

पुढे वाचा, सध्या गुरुग्राममध्ये सुरू आहे ट्रेनिंग...
बातम्या आणखी आहेत...