आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nirmal Singh Said The Bjp Will Decide On Government Formation With The PDP Soon

J&K सरकार स्थापनेबाबत सस्पेन्स, MLA\'sच्या बैठकीत मेहबुबांना अश्रू अनावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मेहबुबा यांची भेट घेतल्यानतंर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखिल मेहबुबा यांना भेटल आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांसमोर काही अटी-शर्थी ठेवल्या आहेत. दरम्यान, रविवारी सायंकाळी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या आमदारांच्या बैठकीत मेहबुबा सहभागी झाल्या, यावेळी वडिलांच्या आठवणीने त्यांना अश्रू अनावर झाले.

पीडीपीच्या बैठकीत काय चर्चा झाली
- पीडीपीशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे, की पीडीपीने आयोजित केलेली ती शोकसभा होती. त्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नाही. असे सांगितले जात आहे, की आमदार आणि वरिष्ठ नेत्यांना पक्षाला मजबूत करण्यासाठी काम करण्याचे सांगण्यात आले.
- मुफ्ती मोहमम्मद सईद यांच्या निधनानंतर मेहबुबा जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनू शकतात. मात्र वडिलांच्या निधनानंतर लागलीच त्यांनी शपथविधीस नकार दिला होता.

काय आहे मेहबुबांच्या चार अटी ?
- पीडीपीने भाजपला स्पष्ट संकेत दिले आहे, की चार दिवसांचा शोककाळ संपल्यानंतरच नव्या सरकारच्या स्थापनेवर निर्णय होईल.
- सूत्रांच्या माहितीनुसार, मेहबुबांनी भाजपसमोर मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीआधी चार अटी ठेवल्या आहेत.
1. सरकारमध्ये उपमुख्यमंत्र्यासारखे कोणतेही पद नसेल.
2. महत्त्वाची सर्व खाती पीडीपीकडे राहातील.
3. संवेदनशील मुद्दे टाळले जातील.
4.  राज्याला केंद्राकडून अधिक मदत मिळेल.

 भाजपनेही ठेवली अटी
- सूत्रांच्या माहितीनुसार, पीडीपीने उपमुख्यमंत्री पद रद्द करण्याची अट ठेवल्यानंतर भाजपने मुख्यमंत्रीपद दोन्ही पक्षांना वेळोवेळी मिळेल अशी अट ठेवली आहे.  
- मेहबुबा ही अट मान्य करण्यास तयार नाहीत.

राज्यातील स्थिती काय
- सरकार स्थापन करण्यात होत असलेल्या उशिरामुळे जम्मू-काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू करण्यात  आली आहे.
- गव्हर्नर एन.एन. व्होरा यांनी शुक्रवारी दोन्ही पक्षांना पत्र लिहून सरकारस्थापन करण्याबाबत स्थिती स्पष्ट करण्यास सांगितले आहे.
- पीडीपीने म्हटले होते, की मेहबुबा वडिलांच्या चौथ्यानंतर (चार दिवसांच्या शोक) नंतर सरकार स्थापन करणार.
- सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप देखिल सईद यांच्या चौथ्यानंतर सरकारला पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देणार.

कशी आहे विधानसभेची स्थिती
- 87 सदस्य असलेल्या जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीचे 28 आणि भाजपचे 25 सदस्य आहेत.
- बहुमतासाठी 44 आमदारांची अवश्यकता आह.

उर्वरित पक्षांचे संख्याबळ
नॅशनल कॉन्फरन्स - 15,
काँग्रेस- 12 ,
जेकेपीसी- 2,
सीपीएम- 1,
अपक्ष - 3.

काँग्रेससोबत सरकार स्थापन करु शकते  पीडीपी
पीडीपी + एनसी + काँग्रेस (28+15+12 = 55)
पीडीपी + काँग्रेस + अपक्ष (28+12+3 = 43) बहुमतासाठी एका आमदाराची गरज असेल.
 
कोण आहेत मेहबुबा मुफ्ती
- मेहबुबा मुफ्ती या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या आणि राजकीय वारसदार आहेत. सईद यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुख्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
- 1999 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिला होता. मात्र नंतर त्या उमर अब्दुल्लांच्या विरोधात पराभूत झाल्या होत्या.
- 2002 मध्ये मेहबुबा पहलगाम येथून विजयी झाल्या होत्या. 2004 मध्ये त्या कांग्रेससोबतच्या आघाडीमध्ये सहभागी झाल्या आणि लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या.
- आता मेहबुबा जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग मतदारसंघातून लोकसभा सदस्य आहेत.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटोज्..