आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षण मंत्र्यांच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनला आक्षेप, म्हटले शांतीच्या दृष्टीने योग्य नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीतारमण रविवारी अरुणाचलच्या अंजा जिल्ह्यात गेल्या. हा जिल्हा चीनला लागून आहे. - Divya Marathi
सीतारमण रविवारी अरुणाचलच्या अंजा जिल्ह्यात गेल्या. हा जिल्हा चीनला लागून आहे.
बीजिंग/नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेश हा वादग्रस्त भाग असल्याचे सांगत, भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्या दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. सोमवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, तुम्हाला चीनच्या पोझिशनबाबत स्पष्टपणे माहिती असायला हवे. भारताचा हा दौरा (सीतारमण यांचा अरुणाचल दौरा) शांतता कायम राहण्याच्या दृष्टीने योग्य पाऊल नाही. सीतारमण रविवारी अरुणाचलच्या अंजा जिल्ह्यात गेल्या होत्या, हा जिल्हा चीनच्या सीमेला लागून आहे. 

शांततेसाठी दोन्ही देशांनी एकत्र येणे गरजेचे.. 
- सीतारमण रविवारी जेव्हा अंजा जिल्हा आणि सीमेला लागून असलेल्या इतर परिसरात दौऱ्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा त्यांच्याबरोबर जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ (ईस्टर्न कमांड) लेफ्टनंट जनरल अभय कृष्णा आणि आर्मीचे इतर मोठे अधिकारीही होते. संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, त्यांनी याठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांशी चर्चा केली आणि सीमेच्या या भागातील परिस्थिती बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला. 
- चीनला या दौऱ्याने त्रास झाला. भारतीय संरक्षण मंत्र्यांनी वादग्रस्त भागाला भेट देऊन अस्थैर्य निर्माण होण्याच्या शक्यता वाढवल्या आहेत. जर याठिकाणी शांतता राहावी असे वाटत असेल तर भारत आणि चीन दोघांना मिळून काम करावे लागणार असल्याचे चीनने म्हटले आहे. 

अरुणाचल मुद्द्यावरून वाद...
- सीतारमण फॉरवर्ड पोस्ट्स वरही गेल्या होत्या. भारत अरुणाचल प्रदेश हा त्यांचा भाग असल्याचे सांगतात. तर चीनच्या मते हा दक्षिण तिबेटचा भाग असून त्याच्यावर त्यांचा अधिकार आहे. 

चीनने काय म्हटले?
- चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनियांग सोमवारी मीडिया ब्रिफिंगमध्ये म्हणाल्या, या भागात चीनच्या पोझिशनबाबत तुम्हाला स्पष्टपणे माहिती असायला हवी. या ईस्टर्न सेक्शनमध्ये भारत आणि चीनच्या सीमेवरून वाद आहे. भारताचा हा दौरा शांततेसाठी योग्य नाही. 
- चुनियांग पुढे म्हणाल्या, आम्हाला आशा आहे की, भारत, चीन एकत्रितपणे सीमेवरील वाद चर्चेतून सोडवण्याचा प्रयत्न करत राहील. 

किती लांब आहे बॉर्डर... 
- लाइन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल (LAC) म्हणजेत प्रत्यक्ष सीमा रेषा भारत आणि चीनला एकमेकांपासून वेगळे करते. ही एकूण 3,488 किलोमीटर लांबीची आहे. या सीमेवरील अनेक भागांवरून दोन्ही देशांमध्ये वाद आहेत. ते वाद सोडवण्यासाठी चर्चेच्या 19 फेऱ्या झाल्या आहेत. पण अद्याप काहीही ठोस हाती लागलेले नाही. 
- भारत आणि चीन यांच्यात जूनपासून ऑगस्टपर्यंत 72 दिवस डोकलाम वाद चालला. त्यावेळी सिक्किमच्या ट्रायजंक्शन भागात दोन्ही देशांचे लष्कर आमने-सामने होते. चीनला या मार्गावर रस्ता बनवायचा होता. पण भूतानने विनंती केल्याने भारतीय सैनिकांनी चीनला तसे करण्यापासून रोखले. त्यानंतर तणाव एवढा वाढला की, नंतर डिप्लोमॅटिक दुव्यांच्या माध्यमातून हे प्रकरण सोडवले. 
- डोकलाम वाद सोडवल्यानंतर ऑक्टोबरमध्ये सीतारमण यांनी नाथुला दौरा केला होता. त्याठिकाणी त्यांनी चीनच्या एखा सैनिकाला नमस्ते केले आणि भारताच्या या संस्कृतीबाबत सांगितले होते. सीतारमण यांच्या या नमस्काराची चर्चा चीनच्या मीडियामध्येही होती. 
 
 
बातम्या आणखी आहेत...