आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनआयटी श्रीनगरमधून हटवण्याची मागणी, दिल्लीहून दीडशे तरुण श्रीनगरकडे रवाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - काश्मीरमधील एनआयटी महाविद्यालयाच्या प्रकरणात सरकार विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला तणाव शनिवारी कायम होता. काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंह यांनी शनिवारी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांनी त्यांच्या इतर सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. परंतु एनआयटी अन्यत्र हलवण्याची मागणी मान्य करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. परंतु त्यानंतरही विद्यार्थी त्यांच्या मागणीवर तसेच आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिले. विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर निर्मलसिंह यांनी पत्रकार परिषदेत एनआयटी वाद संपल्याची घोषणा केली. परंतु बिगर काश्मिरी विद्यार्थी धरण्यावर बसून आहेत.
श्रीनगरमधून एनआयटी अन्यत्र हलवा या यामागणीसाठी विद्यार्थ्यांनी क्लासवर बहिष्कार टाकून मार्गाने आंदोलन केले. उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांच्यासोबतची विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ ठरली. निर्मलसिंह यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. पण मागण्या मान्य झाल्याचे दिसले तरच आम्ही िनदर्शने संपवू, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. निर्मल सिंह यांनी विद्यार्थ्यांना पूर्ण सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. सोमवारपर्यंत संपूर्ण प्रकरण शांत होईल, असा िवश्वासही व्यक्त केला आहे.

दिल्लीहून दीडशे तरुण श्रीनगरकडे रवाना
नवी दिल्ली - माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार श्रीनगर एनआयटी वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून सुमारे दीडशे तरुण विद्यार्थी राष्ट्रध्वज हातात घेऊन श्रीनगरला रवाना झाले आहेत. देशभरातील १२ राज्यांतील विद्यार्थ्यांनी श्रीनगरला जातेवेळी भारत माता की जय चे नारे दिले. त्याआधी त्यांनी राजधानीमध्ये जागरूकता रॅलीदेखील काढली.