आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nithari Case Moninder Pandher Surinder Koli Trade Human Organs

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंढेरच होता नरपिशाच्च, निठारी कांडांतील पीडितांच्या कुटुंबीयांनी कथन केली आपबीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : निठारी कांडातील मुख्य आरोपी सुरेंद्र कोळी (वरील छायाचित्र), मोनिंदरसिंह पंढेर (खालचे छायाचित्र) आणि पंढेरची कोठी

लखनऊ/नोएडा - निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोलीची फाशी 29 ऑक्टोबरपर्यंत टळली आहे. पण कोलीचा मालक मोनिंदर सिंह पंढेरला जमानत मिळाली आहे. पंढेर हाच कोठी क्रमांक डी-5 चा मालक आहे. तेथूनच सुमारे आठ वर्षांपूर्वी मुलांबरोबर करण्याच आलेल्या क्रौर्याची कहाणी समोर आली होती. कोलीच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर आम्ही निठारी गावात पोहोचलो. याच निठारी गावातून अनेक लहान मुले बेपत्ता झाली होती. त्यानंतर एका नाल्यात त्यांचे सांगाडे सापडले होते.
या क्रौर्याला बळी पडलेली कुटुंबे आणि त्यांच्या शेजा-यांनी या प्रकरणातील खरा आरोपी पंढेर असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते पंढेरचा स्वभाव अत्यंत सौम्य आणि चांगला होती. त्यामुळेच कोणालाही त्याच्यावर कधी शंका आली नाही. पंढेरच्या कोठीमध्ये अनेक संशयात्मक बाबी आढळूनही त्याच्या चांगल्या स्वभावामुळेच कोणी काही बोलले नाही.
नोएडाच्या निठारी गावात 2006 मध्ये पंढेरच्या घरात मुलांचे सांगाडे सापडले होते. सीबीआय चौकशीदरम्यान मानवी हाडे आणि नाल्यात मानवी अवयव भरुन फेकलेले 40 पाकिटे सापडली होती. नोएडाच्या सेक्टर-31 मध्ये पंढेरच्या डी-5 या कोठीसमोर राहणा-या धोब्याने सांगितले की, अनेकदा कोठीत अ‍ॅम्ब्युलेन्स डॉक्‍टरांच्या चकरा व्हायच्या. ते येऊन काळ्या पिशवीत काहीतरी घेऊन जात होते. डॉक्टरांसोबत नर्सही असायच्या व त्यांनी चेहरे झाकलेले असायचे, असेही त्याने सांगितले. या धोब्याची मुलगी ज्योती (वय 10) ही देखिल या हत्याकाडांची शिकार बनली होती.

ज्योतीची आई सुनिताने सांगितले की, जेव्हा त्यांनी कोलीकडे डॉक्टरांच्या वारंवार होणा-या चकरांबाबत विचारले तेव्हा त्याने घरात पंढेरची आई आजारी असल्याचे कारण सांगितले. त्यांच्या रुटीन चेकअपसाठी डॉक्टर येतान असे सांगितले. पण कोठीत कोणतीही म्हातारी कधी आढळली नाही, असेही सुनीता म्हणाली.
पुढे वाचा, ज्योतीच्या भावाने सर्वात आधी कोठीत पाहिले सांगाडे व कापलेले शीर