मेरठ- निठारी हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुरेंद्र कोली याच्या फाशीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. येत्या 12 सप्टेंबरला त्याला मेरठ चौधरी चरण सिंह मध्यवर्ती तुरुंगात फासावर लटकवले जाणार असल्याची माहिती तुरूंग निरीक्षक एस.एच.एम. रिझवी यांनी दिली.
14 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या केल्याच्या आरोपाखाली कोलीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरेंद्र कोलीला फाशी देताना सर्व कायदेशीर नियमांचे पालन केले जाणार आहे.
दुसरीकडे, फाशीच्या भीतीने नराधम सुरेंद्र कोली याने अन्न- पाणी सोडले असल्याचे तुरूंग प्रशासनाने सांगितले आहे. गाझियाबाद येथील कोर्टाने बुधवारी सुरेंद्र कोली याला 'डेथ वॉरंट' जारी केले होते. गाझियाबाद येथील डासना तुरूंगातून त्याला मेरठ तुरूंगात हलवण्यात आले. 90 मिनिटांच्या प्रवासात कोली काहीच बोलला नाही. तो सारखा फुंडून फुंडून रडत होता.
दरम्यान, सुरेंद्र कोलीला 10 सप्टेंबर रोजी फासावर चढवले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मेरठमधील चौधरी चरणसिंह जिल्हा मध्यवर्ती तुरुंग प्रशासन तयारीला लागले आहे. जल्लाद पवन याने फाशीचा ओटा आणि दोरखंडाची पाहणी केल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, गाजियाबाद सेशन कोर्टाने बुधवारी सुरेंद्र कोलीच्या विरोधात 'डेथ वॉरंट' जारी केले. या पार्श्वभूमीवर तुरुंग प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. मेरठ तुरुंगात तब्बल 39 वर्षांनंतर एखाद्या आरोपीला फासावर चढवले जाणार आहे. जल्लाद पवन हा सुरेंद्र कोलीला फासावर लटकवणार आहे. पवन याने गुरुवारी सकाळी मेरठ तुरुंगातील फाशीच्या घराची पाहणी केली. फाशी घरातील ओट्याची डागडुजीही केली जाणार आहे. तसेच फाशीचा खांब देखील बदलला जाणार आहे. या कामास दोन-तीन दिवसांचा अवधी लागेल. फाशीसाठी विशेष दोरखंड देखील गोदामातून बाहेर काढण्यात आला आहे.
सुरेंद्र कोलीवर 16 आरोप होते. त्यापैकी पाच आरोपांत त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोली सध्या गाजियाबादमधील तुरुंगात बंद आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, मेरठ तुरुंगात यापूर्वी कोणाला चढवले होते फासावर...
(फोटो: मेरठ मध्यवर्ती तुरुंग, सुरेंद्र कोली (इन्सेटमध्ये)