मेरठ- 2006 मध्ये घडलेल्या निठारी हत्याकांडामुळे संपूर्ण देशाला हादरला होता. तब्बल आठ वर्षांनंतर निठारी हत्याकांडातील प्रमुख दोषी सुरेंद्र कोली याला फासावर लटकावले जाणार आहे. येत्या 12 सप्टेंबरला नराधम कोलीला मेरठ मध्यवर्ती कारागृहात फासावर लटकावले जाणार आहे.
फाशी होणार असल्याने नराधम सुरेंद्र कोलीची रात्री झोप उडाली आहे. त्याने अन्न, पाणी सोडले आहे. हाय सेक्युरिटी बॅरेकमध्ये ठेवण्यात आलेल्या कोलीने धार्मिक ग्रंथ वाचण्यास सुरुवातही केली आहे. एवढेच नव्हेतर फाशी कशी दिली जाते, याबाबत कारागृह अधिकार्यांकडून माहितीही जाणून घेतली आहे.
मेरठ कारागृह अधिक्षक मोहम्मद हुसैन मुस्तफा रिझवी यांनी सांगितले की, कोलीसाठी धार्मिक ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले आहे. फाशीची शिक्षा होणार असल्याने कोली फारच भेदरला आहे. भीतीमुळे त्याचे ब्लड प्रेशरही कमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलीने शुक्रवारी उडदाची डाळ, भोपळ्याची भाजीसोबत तीन पोळ्या खाल्या. मात्र, गुरुवारी रात्री कोलीने जेवण केले नव्हते. तो रात्री झोपलाही नव्हता.
कोलीच्या प्रकृतीबाबत कारागृह प्रशासन सतर्क...
फाशीच्या भीतीमुळे सुरेंद्र कोलीचे ब्लड प्रेशर कमी झाले आहे. यामुळे कारागृह प्रशासन कोलीची काळजी घेत आहे. कोलीची दिवसातून तीन वेळा तपासणी केली जाते. तसेच कोलीचा वैद्यकीय अहवाल दररोज लखनौला पाठवावा लागत असल्याचे कारागृह प्रशासनाने म्हटले आहे. कोलीच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
मोठी सुरक्षा
2006 मध्ये घडलेल्या निठारी हत्याकांडात आरोपी मोनिंदर सिंह पंढेरचा नोकर सुरेंद्र कोली याला मेरठ येथील मध्यवर्ती कारागृहात मोठ्या सुरक्षेत ठेवण्यात आले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नराधम सुरेंद्र कोलीची दया याचिका यापूर्वीच फेटाळळली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, सुरेंद्र कोलीची फाशी टळू शकते...
(फोटोः मेरठ मध्यवर्ती कारागृह)