आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटण्यात मोदीविरोधी राजकारणाची ‘शपथ’, नितीशकुमार झाले मुख्यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- तो फक्त सत्तास्थापनेचा शपथविधी नव्हता, तर नव्या राजकारणाच्या संकेतांचा श्रीगणेशाही होता. नितीशकुमार यांच्या शपथविधी समारंभाच्या वेळी मंचावर मोदीविरोधी सर्व नेते एकत्र आले होते. राहुल आणि केजरीवाल यांनी लालूंची गळाभेट घेतली. ममता आणि डावे पक्ष परस्परांकडे पाहत स्मितहास्य करत होते, तर महाराष्ट्राच्या राजकारणात ३६ चा आकडा असलेले शिवसेना आणि शरद पवारही होते. दरम्यान, नितीश पाचव्यांदा मुख्यमंत्री झाले आणि लालूंची दोन मुले मंत्री. धाकटा मुलगा उपमुख्यमंत्री, तर मोठा कॅबिनेट मंत्री. काँग्रेसला ४ मंत्रिपदे मिळाली.

७ राज्यांतील विरोधी नेते एका मंचावर
दिल्लीतील आपचे केजरीवाल-काँग्रेसच्या शीला दीक्षित, महाराष्ट्रातील शिवसेनेचे रामदास कदम- राष्ट्रवादीचे शरद पवार, प. बंगालमधून ममता बॅनर्जी- डाव्यांचे येचुरी, कर्नाटकमधून जदसेचे देवेगौडा - काँग्रेसचे सिद्दरामय्या, हरियाणातील काँग्रेसचे हुडा - इंनॅलोचे अभय चौटाला, झारखंडचे झामुमोचे हेमंत सोरेन - झाविमोचे बाबुलाल मरांडी व आसाममधील तरुण गोगोई आणि आगपचे प्रफुल्ल महंत हे एका मंचावर दिसले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, १९ वर्षांनंतर पुन्हा झाले राजकीय ध्रुवीकरण