आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar And Jitan Manjhi On Different Track

नितिश-लालू यांच्यात जागा वाटपावरून मतभेद; जदयूमध्येही सुरू झाले वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : नितिश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांची गळाभेट

पटना - बिहारमध्ये भाजपचे वाढत्या वर्चस्वाला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय जनता दल (राजद)चे अध्यक्ष लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार एकत्र येण्यास तयार झाले, मात्र पुढील महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभा पोटनिवडणूकीतील 10 जागांच्या वाटपावरून राजद आणि जद(यु) मध्ये मतभेद आहेत. मिळालेल्या माहितीनुसार लालू प्रसाद यादव सहा जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत, तर नितिश कुमार सक्षम उमेदवारांना जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशिल आहेत. तर याच मुद्द्यावर मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि नितिशकुमार यांच्यामध्येही वेगळेच सूर ऐकायला मिळत आहेत. काही दिवसांपुर्वीच नितीशकुमार यांनी बिहारमधील वाढणार्‍या भाजपला आळा घालण्यासाठी राजद, जदयू आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य केले होते.

नितिश यांच्या इफ्तार पार्टीत पोहोचल्या राबडी देवी
जागा वाटपावरून राजद आणि जदयू यांच्यात चांगलाच पेच सुरू असताना, लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी बुधवारी नितिश कुमार यांच्या इफ्तार पार्टीत हजर राहिले. या दरम्यान पत्रकारांनी नितिश यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणत्याही प्रश्नास उत्तर देण्यास नकार दिला. नितिश पत्रकारांना म्हणाले की, "तुम्ही येथे आला आहात, तर काही खा-प्या, तुम्ही काहीच कसे घेत नाही."
नितिश आणि मांझी यांच्यात वेगळे सूर
पोटनिवडणकीमध्ये जागा वाटपावरून जदयूमध्येही वेग-वेगळी सूर ऐकायला मिळत आहेत. जीतन राम मांझी बुधवारी म्हणाले की, 'राजद'सोबत जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. मात्र नितिश यांनी या वक्तव्याचे खंडन केले आहे. नितिश म्हणाले की, "जागा वाटपाबाबत आमची राजदसोबत कोणतीही चर्चा सूरू नाही. अजून पक्षामध्येच या विषयी अजून चर्चा होणे बाकी आहे." तसेच पक्षाचे नेते वशिष्ठ नारायन सिंह यांनी या संदर्भात लालू यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र, लालू त्यांना वेळ देत नाहीत, या वृत्तालाही नितिश यांनी फेटाळून लावले.
प्रथम पक्षामध्ये चर्चा होईल
नितिश याबाबत म्हणाले की, "वशिष्ठ बाबू राज्यसभेचे सदस्य असल्याने ते सभागृहाच्या कामकाजात सहभाग नोंदवण्यासाठी दिल्लीत गेले आहे. अजून पक्षामध्ये या मुद्द्यावर चर्चा होणे बाकी आहे. त्यानंतरच इतर पक्षांसोबतच राजदशीही तडजोडीविषयी चर्चा होईल."

लालू यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही, आज वशिष्ठ परतणार
वशिष्ठ यांची लालू प्रसाद यादव यांच्याशी दिल्लीत भेट होऊ शकली नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वशिष्ठ यांनी लालू यांना भेटण्याचे अनेक प्रयन्त केले मात्र लालू या भेटीसाठी उत्सूक नसल्याचे दिसले. यामुळे आता जदयूचे प्रदेशाध्यक्ष गुरूवारी पटनाला येणार आहेत. त्यामुळे आता कोणतीही चर्चा ही पटनामध्येच होईल.

पुढील स्लाईडवर वाचा... काय आहे लालू यांची रणनिती?