आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीशिवाय योगाला अर्थ नाही : नितीशकुमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेदिनीनगर (झारखंड) - जोपर्यंत मद्य खरेदी-विक्रीवर पूर्णपणे बंदी येत नाही, तोपर्यंत योगाला काहीच महत्त्व नसल्याची टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला केली आहे. देशभरात दारूबंदी लागू करावी, अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

झारखंडच्या मेदिनीनगरमध्ये एका बैठकीनिमित्त आले असताना त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले, योग ही एक निसर्गोपचार पद्धत आहे. मात्र, मद्यपी ते करू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत मद्य विक्री आणि खरेदी पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत योगाला काहीच अर्थ नसेल. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणांवरही टीका केली. मी कित्येक वर्षांपासून योग करतो. मात्र, त्यांच्याप्रमाणे याची कधीही प्रसिद्धी केली नाही. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी दारूबंदी केली होती. आम्ही जनतेच्या कल्याणाचा विचार करता ५ हजार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडले. हा महसूल उद्योग किंवा व्यवसायांना चालना देऊन कमावता येऊ शकतो. तिजोरीला बसणाऱ्या फटक्याची इतर मार्गांनी भरपाई होऊ शकते. मात्र, जनतेचे कल्याण महत्त्वाचे आहे. आमच्या सरकारन त्याला महत्त्व देऊनच दारूबंदीचा निर्णय घेतला.
बातम्या आणखी आहेत...