आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीशकुमारांना चपला दाखवून केला विरोध, सभेत लोकांनी बोलूच दिले नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवादा (बिहार)- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मंगळवारी मोठ्या विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला. वारीसलीगंज येथील निवडणूक प्रचार सभेत लोकांनी नितीश यांना बोलूच दिले नाही. लोकांनी त्यांच्या सभेत सुमारे ३५ मिनिटे चप्पल दाखवत त्यांना विरोध केला व नारेबाजी केली. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या सभेत लोक मोदी - मोदीच्या घोषणा देत होते.

प्रेक्षकांचा विरोध सुरू असतानच नितीश बोलण्यासाठी उभे राहिले. त्यांनी सुरक्षा रक्षकांना सांगितले, जे विरोध करत आहेत, त्यांना विरोध करू द्या. हे सगळे फोटोत झळकण्यासाठी सुरू आहे. त्यांनी लोकांना विचारले की, ज्यांना भाषण एेकायचे आहे त्यांनी हात वर करावा. गर्दीने हात वर केले. नितीश म्हणाले , मागे बघा कोणते लोक जास्त आहेत ते? त्यानंतर जदयू कार्यकर्तेही आक्रमक झाले. हे पाहून विरोध करणारे शांत झाले. त्यानंतर भाषण सुरू ठेवत नितीश म्हणाले, "जनतेने एक संधी दिली तर बिहारचे चित्र बदलून टाकू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत घोषणा केली होती की, विदेशातील काळा पैसा परत आणू. परंतु ते अजूनही आले नाही. बिहारमध्ये सत्ता आल्यास महिलांना नोकऱ्यांमध्ये ३५ टक्के आरक्षण देऊ.'
प्रलोभने दाखवल्याबद्दल सुशीलकुमार मोदींविरोधात गुन्हा दाखल
भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांच्या विरोधात भभुआ येथील निवडणूक प्रचार सभेत मतदारांना लॅपटॉप, टीव्ही व धोतर - साडी वाटण्याचे प्रलोभन दाखवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैमूर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक हरप्रीत कौर यांनी सांगितले की, व्हिडीओ फुटेजचा आधार घेऊन एफआयआर दाखल करण्यात आली अाहे. भाजपचे उमेदवार आनंदभूषण पांडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्यानंतर घेतलेल्या सभेत सुशील मोदींनी मतदारांना वरील आश्वासन दिले होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा यादव समाजाचा नेता असेल बिहार एनडीएचा मुख्यमंत्री : गिरिराज सिंह...