आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेना सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक कमाई करणारी जगातील अव्वल खेळाडू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयाॅर्क- अमेरिकनटेनिस स्टार सेरेना विल्यम्स अाता सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू ठरली अाहे. तिने सर्वाधिक कमाईमध्ये अनेक दिग्गजांना पिछाडीवर टाकले. नुकतीच फाेर्ब्जने हायएस्ट पेड फिमेल अॅथलेटिक्सची यादी जाहीर केली.
 
यामध्ये सेरेना ही २७ मिलियन डाॅलरसह (१७३ काेटी) यादीमध्ये अव्वल स्थानावर अाहे. ही यादी जून २०१६ ते जून २०१७ दरम्यानच्या अार्थिक उत्पन्नावर तयार केली जाते. यंदा महिलांच्या खेळाडूंच्या कमाईमध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १३ टक्क्यांनी घसरण झाली अाहे. या टाॅप-१० च्या यादीतील अव्वल अाठ खेळाडू हे टेनिसमधील अाहेत. गतवर्षी दुसऱ्या स्थानावर असलेली मारिया शारापाेवा यंदा प्रथमच टाॅप-१० मधून बाहेर झाली अाहे. ती १२ वर्षांत प्रथमच सर्वाधिक कमाई करणाऱ्या अव्वल दहा खेळाडूंमध्ये नाही.
 
सेरेनाने यंदा सत्रातील अाॅस्ट्रेलियन अाेपन किताब जिंकल्यानंतर काेर्टपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिच्या उत्पन्नावर काेणत्याही प्रकारचा परिणाम पडला नाही. तिने बक्षिसाच्या रकमेपेक्षा जाहिरातींमधून माेठ्या प्रमाणात कमाई केली अाहे. ती अाताही एक डझनभर जाहिरातींमध्ये काम करताना दिसत अाहे. तिने अापल्या करिअरमध्ये अातापर्यंत ८४ मिलियन डाॅलरची (५३८ काेटी) कमाई केली. ही रक्कम महिला खेळाडूने बक्षीस रकमकेपेक्षा निश्चितच दुप्पट ठरली अाहे.
 
जर्मनीची एंजेलिक कर्बर १२.६ मिलियन डाॅलरसह (८० काेटी) दुसऱ्या स्थानावर अाहे. अमेरिकन कुस्तीपटू डेनिका पॅट्रिक १२.२ मिलियन डाॅॅलरसह (७८ काेटी) तिसऱ्या स्थानावर विराजमान अाहे. अमेरिकन मिक्स मार्शल अार्टिस्ट अाणि ज्युदाेपटू राेंडा राउसी (११ मिलियन डाॅलर) चाैथ्या अाणि व्हीनस विल्यम्स पाचव्या स्थानावर अाहे. यंदा सर्बियाची टेनिस स्टार अॅना इव्हानाेविक अाणि बेलारूसची व्हिक्टाेरिया अझारेंका प्रथमच अव्वल दहामधून बाहेर झाल्या अाहेत.
 
पुढील स्‍लाइडवर टॉप-10 खेळाडू...
 
बातम्या आणखी आहेत...