आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar May Stake Claim To Form New Government In Bihar

मांझींच्या मंत्र्यांनी समर्थनासाठी धमकावले, जदयूच्या महिला आमदाराचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटना/नवी दिल्ली - बिहारमधील राजकीय वातावरण वेगाने बदलत आहे. मांझी यांच्या समर्थक मंत्र्यांवर आणि आमदारांवर जनता दल संयुक्त (जदयू)च्या एका महिला आमदाराला धमकी दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. मांझी सरकारमध्ये मंत्री असलेल्या बीमा भारती यांनी मांझी यांना समर्थन देण्यासाठी मांझी यांचे निकटवर्तीय मंत्री विनय बिहारी आणि सुमित सिंग यांनी धमकी दिल्याचे सांगितले आहे. सचिवालय ठाण्यात बीमा भारती यांनी मंत्री विनय बिहारी आणि सुमित सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रविवारी नितीश कुमार यांचे समर्थका जदयू प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांच्या नेतृत्वाखाली राजभवनात पोहोचले. वशिष्ठ नारायाण सिंह यांनी राज्यपाल यांचे मुख्य सचिव यांना एक चिठ्ठी दिली. ज्यामध्ये जीतनराम मांझी यांना पक्षाच्या नेतेपदावरून हटवण्यात आले असून नितीश कुमार यांची नव्याने विधीमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली असल्याचे लिहिले आहे. तसेच नवीन सरकार बनवण्यात येईल असा दावाही त्यांनी केला आहे. वशिष्ठ नारायण सिंह यांच्या समवेत विजय चौधरी, आर सी पी सिंह आणि राजद नेते अब्दूल बारी सिद्दीकी यांच्यासोबतच काँग्रेस आणि सीपीआयचे नेतेही यावेळी उपस्थिती होते.
सध्या बिहारचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी पटनाच्या बाहेर आहेत. नितीश कुमार यांनी सोमवारी राज्यपाल यांना भेटण्याची वेळ मागितली आहे. तर दूसरीकडे विधानसभा स्पीकरनेही नितीश यांची विधिमंडळाच्या नेतेपदासाठी मान्यता दिली आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, जदयू नेत्यांनी राजभवनात दिलेल्या चिठ्ठीची प्रत