आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद यादव आपला मार्ग निवडायला स्वतंत्र आहेत; मोदींच्या भेटीनंतर म्हणाले नितीश कुमार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - नितीश कुमार म्हणाले की, जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद यादव आपला मार्ग निवडायला स्वतंत्र आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोदींशी भेट घेतल्यानंतर हे वक्तव्य केले. मोदींशिवाय नितीश यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांचीही भेट घेतली. या भेटीबाबत नितीश म्हणाले की, ही फक्त औपचारिक भेट होती. बिहारमधील विकास योजनांच्या मुद्दयावर मी पुन्हा एकदा पंतप्रधानांची भेट घेणार आहे. 
 
शरद यादवांबद्दल आणखी काय म्हणाले...
- महाआघाडीतून वेगळे होऊन भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या नितीश यांच्या निर्णयावर जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद यादव नाराज आहेत.
- शरद यादव यांच्याबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर नितीश म्हणाले की, ते आपला मार्ग निवडण्यासाठी स्वतंत्र आहेत. पक्षाने पूर्ण विचार केल्यानंतर हा निर्णय घेतला होता. सर्वांच्या संमतीनंतरच भाजपसोबत गेलो आणि बिहारमध्ये सत्ता स्थापन केली. मी काही करण्याआधी पक्ष सदस्यांचे जरूर मत घेतो.
बातम्या आणखी आहेत...