आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar News In Marathi, Narendra Modi, Prime Minister, Divya Marathi

विषारी प्रचार करून नरेंद्र मोदी पीएमपदी पोहोचले, नितीशकुमार यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छपरा - नरेंद्र मोदी यांनी विषारी प्रचार करून पंतप्रधानपदापर्यंत मजल मारली. आता हे विष नष्ट करण्यासाठी आपण लालूप्रसाद यांना साथ दिली असल्याचे सांगत बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपवर प्रखर टीका केली.बिहारमधील 10 विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार या द्वयींनी छपरामधून सुरू केला. भाजपच्या विरोधात 20 वर्षांनंतर नितीश-लालूप्रसाद या निवडणुकीत एकत्र आले आहेत. 21 ऑगस्टला या पोटनिवडणुकीचे मतदान
होत आहे.

भाजप गर्विष्ठ : भाजपला सध्या गर्व चढला आहे. मात्र, जनता दल (संयुक्त), राष्टÑीय जनता दल आणि काँग्रेस आघाडी मिळून बिहारमध्ये भाजपचा सफाया करतील, असा दावा नितीश यांनी केला. या वेळी लालूंनी नितीश यांना लहान भाऊ संबोधून त्यांचे तोंडभरून कौतुक केले. दोघांत आता मुख्यमंत्रिपद हा मुद्दाच राहिला नसल्याचेही त्यांनी सांगितले. देश आज चुकीच्या लोकांच्या हाती गेल्याने आपण एकत्र आलो असल्याचे दोघांनीही सांगितले.
हे तर ठगबंधन! : लालू-नितीश युतीला भाजपने ‘ठगबंधन’ संबोधले. भाजप नेते नंदकिशोर यादव यांनी ही युती संधीसाधू असल्याचे म्हटले आहे.

पासवान हवामान तज्ज्ञ
रामविलास पासवान यांना हवेची दिशा लगेच कळते. त्यांच्यासारखा हवामान तज्ज्ञ आपण पाहिला नसल्याचे सांगत लालूंनी पासवान यांच्यावरही टीका केली. आपल्या राजकीय गरजांनुसार ते आघाड्या बदलत राहतात, असेही लालू म्हणाले. यावर पासवान यांनी लालू-नितीश या पारंपरिक शत्रूंची युती टिकेल काय, अशी शंका व्यक्त केली.