आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar Says I Am As Good As Any Prime Ministerial Candidate

पंतप्रधानपदासाठी मोदींपेक्षा मी योग्य उमेदवार - नितीशकुमार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल संयुक्तचे (जेडीयू) नेते नितीशकुमार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदीं पेक्षा पंतप्रधानपदासाठी मी लायक उमेदावार असल्याचे म्हटले आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार मोदींवर त्यांनी जोरदार टीका केली. त्यांनी मोदी आणि राहुल गांधी यांचे नाव न घेता म्हटले,'सध्या जे नेते पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून फिरत आहे, त्यांना लोकसभेचा अनुभव नाही आणि राज्याच्या कारभाराचाही नाही. मात्र, माझ्याकडे हे दोन्ही अनुभव आहेत.' मोदींवर निशाणा साधताना ते म्हणाले, ज्यांना संसदेचे नेतृत्व करण्याची इच्छा आहे त्यांना संसदेचा कितपत अनुभव आहे? माझा राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मी राज्यात मुख्यमंत्री असताना आणि संसदेत मंत्री असताना अनेक कामे केली आहेत. पंतप्रधानपदाच्या मुद्यावर स्पष्ट न बोलता इशा-यामध्ये त्यांनी पंतप्रधान होण्यात गैर काही नसल्याचे म्हटले आहे.
बिहारसाठी काहीही करण्याची तयारी
बिहारच्या विकासासाठी काहीही करण्याची तयारी असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. ते म्हणाले, मोदींशी माझा वैयक्तिक वाद नाही. ते म्हणाले, 2002 ला गुजरातमध्ये दंगली भडकल्या त्यामुळे 2004 मध्ये एनडीचा सफाया झाला. 2002 मध्ये अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो, मी काही मोदींच्या मंत्रिमंडळात नव्हतो. त्यामुळे तेव्हा राजीनामा देण्याचा काही प्रश्नच नव्हता.