आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या पाकिस्तान दौर्‍याला नितीशकुमारांचे समर्थन, लालू म्हणाले 'फेल'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत असले तरीही मोदींच्या पाकिस्तान दौऱ्याचे शरीफ यांच्या भेटीचे िनतीशकुमार यांनी समर्थन केले आहे. पाकिस्तानसोबत संबंध सुधारले पाहिजेत. या दौऱ्याकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जाऊ नये, असे िनतीश यांनी म्हटले आहे. दुसरीकडे राजदचे नेते माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी मात्र मोदी देशाला सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरल्याची टीका केली आहे.

नितीश यांनी पंतप्रधान मोदींचा पाकिस्तान दौरा हे एकदम योग्य पाऊल असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांच्या पाक दौऱ्यात कोणत्याही राजकारणातून पाहिले जाऊ नये. नितीश पुढे म्हणाले की, "मोदींनी नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी जाऊन संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले. यात काहीही चुकीचे केलेले नाही. काही लोक म्हणतात की, मोदींचा पाक दौरा आधीपासूनच निश्चित नव्हता; परंतु मी म्हणेन की हा दौरा पूर्वनियोजित असता तरीही त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. सध्याच्या ताज्या घडामोडींबाबत बोलायचे झाले तर जेव्हा जेव्हा पाकसोबत संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न होतात तेव्हा त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जातो. पाकमध्ये भारतासारखी सक्षम लोकशाही नाही. पाकिस्तानात काही शक्ती अशा आहेत की, ज्यांना दोन्ही देशांचे संबंध सुधारावेत, असे वाटत नाही.' हे वैयक्तिक मत असल्याचे सांगायलाही नितीश विसरले नाहीत.

राजदच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नवव्यांदा अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. मोदींवर टीका करताना ते म्हणाले की, ‘बिहारमध्ये जंगलराज - आल्याची टीका ते करतात. परंतु त्यांनी स्वत:च देशाला जंगलराज बनवले आहे. पठाणकोटमध्ये अतिरेकी कसे काय घुसले? याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे. मोदी सरकारमध्ये देश सुरक्षित नाही. देशाला सुरक्षा पुरवण्यात ते अपयशी ठरले', असे लालूप्रसाद म्हणाले.

मोदी फेल : लालू
पाटणा- राजदसुप्रीमो लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पठाणकोट हवाईतळावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोदींना "तुमची ५६ इंचांची छाती कुठे गेली? काय झाले? सीमेपलीकडून दहशतवाद्यांनी आपल्या घरात घुसून आमच्या जवानांना का मारले?' असे प्रश्न लालूंनी विचारले.
बातम्या आणखी आहेत...