आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआघाडी आज करणार दावा; 20 नोव्हेंबरला शपथविधी शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- नितीशकुमार 14 नोव्हेंबरला राज्यपाल रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन महाआघाडीचे सरकार स्थापन करण्याचा दावा करतील. त्याच दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15 वी विधानसभा विसर्जित करण्याची परवानगी देखील मागण्यात येईल.

शनिवारी होणाऱ्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. त्यात नितीशकुमार यांना विधिमंडळ गटाचा नेता म्हणून निवड केली जाईल. सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर शपथविधीची तारीख आणि त्याचे स्थळ निश्चित केले जाईल. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकारचा शपथविधी 20 नोव्हेंबर रोजी गांधी मैदानात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, गुरुवारी नितीशकुमार यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर उभयतांत राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरही चर्चा झाली.
बातम्या आणखी आहेत...