आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar Slams Narendra Modi For Seeing Terrorism Through 'communal' Eyes

मोदी दहशतवादही जातीयवादाच्या चष्म्यातून पाहतात - नितीश कुमार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गया - नरेंद्र मोदी हे दहशतवादासारखा मुद्दाही जातीयवादाच्या चष्म्यातून पाहत असल्याची टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली. गेल्या वर्षी बोधगया येथी दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यामागे हेच कारण असल्याचेही ते म्हणाले. केवळ मोदींसारखी व्यक्तीच अशा प्रकारचे वक्तव्य करू शकते, असेही नितीश कुमार गया येथे एका सभेदरम्यान म्हणाले. मोदींसाठी सर्व दहशतवादी हल्ले हे त्यांच्या नावडत्या अल्पसंख्याक समाजाने केलेले कृत्य असते, अशी टीका त्यांनी मोदींचे नाव न घेता केली. नितीश कुमार यांना व्होट बँकेची काळजी असल्याने त्यांना गया येथील हल्ले रोखण्यात अपयश आल्याचे मोदी म्हणाले होते.