आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar Starts Campaigning For Upcoming Assembly Election

नितीश यांचे निवडणूक बिगुल ‘हर घर दस्तक’, घरोघर जाऊन प्रचार सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला गुरुवारी सुरुवात केली. सरकारने गतकाळात केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘हर घर दस्तक’ ही योजना हाती घेण्यात आली आहे. त्याची सुरुवात कुमार यांनी मोहिमेच्या बिगुलाने केली.

प्रचार मोहिमेची सुरुवात करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पश्चिम दरवाजा येथील १० कुटुंबांची भेट घेतली. विशेष म्हणजे भाजपचे नेते नंदकिशोर यादव या भागाचे नेतृत्व करतात.

हा परिसर पाटणा साहिब मतदारसंघात येतो. जदयूच्या वतीने लोकसंपर्काची अगोदरच आैपचारिक सुरुवात करण्यात आली होती. प्रदेशाध्यक्ष वसिष्ठ नारायण सिंह यांनी पक्षाच्या मुख्यालयात त्याची सुरुवात केली होती. लोकांना घरोघर जाऊन भेटण्यापूर्वी नितीश कुमार यांनी पाटणादेवी मंदिरात जाऊन पूजा केली.
मी जदयूचा प्रामाणिक सैनिक
पक्षाने हर घर दस्तक ही मोहीम सुरू केली आहे. पक्षाध्यक्षांनी ही मोहीम सुरू केल्यानंतर आता माझ्या पातळीवर मी दहा घरी जाऊन सरकारच्या योजनांची माहिती दिली. लोकांशी संवाद साधला. जदयूचा प्रामाणिक सैनिक म्हणून मोहिमेत सक्रिय आहे.
नितीश कुमार.
१० हजार कार्यकर्ते
जदयूचे १० हजार कार्यकर्ते मोहिमेत सहभागी झाले असून ते जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. खाद्य मंत्री श्याम राजक यांनी फुलवारिशरीफ मतदारसंघातील १० मतदारांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.