आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१. ६५ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे नितीशकडून स्वागत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - केंद्र सरकारने बिहारसाठी जाहीर केलेल्या १.६५ लाख कोटींच्या पॅकेजचे मुख्यमंत्री िनतीशकुमार यांनी स्वागत केले आहे, परंतु या पॅकेजच्या अंमल बजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी िवधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सभागृह समिती स्थापन करण्याची शिफारस त्यांनी केली आहे. िवधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना िनतीशकुमार यांनी या पॅकेजचे स्वागत केले होते. बिहार निवडणुकीच्या वेळी प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी िबहारसाठी १.६५ लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्या वेळी िनतीश यांनी हे पॅकेज बोगस असून आकडेवारी फसवी असल्याची टीका केली होती. मोदी व भाजपला िनवडणुकीत पॅकेजचा लाभ झाला नाही, परंतु त्यानंतरही जाहीर िनधी व योजना िदल्या जातील, असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले होते.