आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar Will Be Elected As Leader Of Parliamentary Board Tomorrow

विधीमंडळ नेतेपदी नितीश कुमारांची उद्या निवड, केंद्राशी संबंधांबाबत उत्सुकता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमध्ये 16 व्या विधानसभेच्या आणि सत्ता स्थापनेची लगबग सुरू आहे. शनिवारी मुख्यमंत्री नीतीश कुमार राज्यपाल रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन महाआघाडीच्या वतीने सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत नेते एकमेकांविरोधात होते की राज्य आणि केंद्राचे सरकार असे चित्र होते. पण आता काय होणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. केंद्रात बसलेले मोदी आणि बिहारमध्ये पुन्हा मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गावर असलेले नितीशकुमार यांच्या पुन्हा वाद सुरू होणार की, दोघे मिळून बिहारला विकासाच्या मार्गावर पुढे नेणार, अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे.

नितीश यांची निवड उद्या, राजदमध्ये तेजस्वी यादवकडे नजरा
शनिवारी आधी जेडीयूच्या संसदीय मंडळाची पैठक होईल आणि त्यानंतर महाआघाडीच्या संयुक्त बैठकीमध्ये नितीशकुमार यांची नेतेपदी निवड केली जाईल. राजद आजच नेता निवडणार आहे. त्यात तेजस्वी यादवचे नाव आघाडीवर आहे. कांग्रेसचे संसदीय मंडळ शनिवारी नेता निवडणार आहे. आम्ही विजयाने भारावून जात नाही. आम्ही विरोधकांचाही सन्मान करू असे यावेळी नितीशकुमार म्हणाले. सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर शपथविधीची तारीख आणि स्थळ ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. नितीश यांच्या नेतृत्त्वात नवे सरकार 20 नोव्हेंबरला गांधी मैदानात शपथ घेण्याची शक्यता आहे.

विकास की पुन्हा वाद, चर्चांना उधाण
प्रचारादरम्यान दोन्ही बाजुंनी एकमेकांवर झालेले वार अझूनही लोक विसलेले नाहीत. पण हे सर्व निवडणुकीपुरते होते की पुढेही हे सर्व असेच सुरू राहणार हा सर्वात मोठा प्रश्न सध्या जनतेसमोर आहे. गेल्या काही वर्षात सातत्याने बिहारमधील आणि केंद्रातील सरकार एकमेकांविरोधी असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. या ना त्या कारणावरून दोन्ही सरकारांमध्ये वाद होत असतात. पण आता काय होणार याची सगळीकडे चर्चा आहे.

मोदींची आश्वासने...
- बिहारच्या विकासासाठी केंद्राबरोबरच राज्यातही सत्ता गरजेची असल्याचे मोदींनी प्रचारात वारंवार म्हटले होते. पण तसे झाले नाही. स्पेशल पॅकेज दिल्यानंतरही मोदींनी वारंवार नितीश सरकार एकही पैसा देण्याच्या लायकीचे नसल्याचे म्हटले होते. अशाच अनेक टीका दोन्हीकडून जाल्या होत्या.

- पण असे वाद फार काळ चालत नसतात. सध्यादेखिल अनेक राज्यांत गैर भाजप सरकार आहे. केंद्राशी त्यांचे संबंध फारसे चांगले नसले तरी वाईटही नाहीतच. केंद्राला ठरवूनही राज्यावर अन्याय करता येत नाही. त्यात आता असे काही केल्यास आणि नाचक्की होऊ शकते.

- लढा थांबलेला नाही. नितीशकुमार आणि लालू यांनी निकालानंतर लगेचच आपल्या जबाबदारी स्पष्ट केल्या आहेत. नितिश यांनी जनतेच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी कोणतीही कसर ठेवणार नाही असे म्हटले. तर लालूप्रसाद यादव यांनी दिल्लीवर चढाईची सुरुवात मोदींचा मतदारसंघ वाराणसीतूवन करण्याची घोषणा केली.

सर्वात मोठा प्रश्न पॅकेज मिळेल की नाही, आणि केव्हा?
> हे सव्वालाख कोटींचे पॅकेज आहे. नितीशकुमार यांनी यापैकी 80 टक्के मागचेच बाकी असल्याचे म्हटले होते. तरीही बिहार त्याची वाट पाहत आहे.
> याबाबत काही शंका आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहने हे पॅकेज मिळणार असे म्हटले आहे. जेटलींचाही त्याला दुजोरा आहे. त्यांच्यामते राजकारण संपले आहे. आतात बिहारच्या विकासासाठी हवे ते सर्व केले जाणार आहे.