आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitish Kumar With Legislators In Delhi, Demand Time To President

आमदारांसह नितीशकुमार दिल्लीत; राष्ट्रपती मुखर्जी यांच्याकडे वेळ मागितला, आज भेटणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमध्ये बहुमताचा दावा केल्यानंतरही राज्यपाल सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्यात विलंब करत असल्याने जनता दलाचे (संयुक्त) नेते नितीशकुमार आमदारांसह दिल्लीला रवाना झाले. आता थेट राष्ट्रपतींसमोरच शक्तिप्रदर्शन करण्याचा निश्चय नितीश यांनी केला असून त्यांनी राष्ट्रपतींकडे बुधवारी वेळ मागितला आहे.

जदयू, राजद, काँग्रेस आणि भाकपच्या आमदारांशिवाय अपक्ष मिळून १३० आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा नितीश यांचा दावा आहे. हे सर्व आमदार राजभवनावर नेऊन सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतरही राज्यपालांनी पाचारण केले नसल्याचे नितीश म्हणाले. या विलंबामुळे विरोधी गटात आमदार फोडाफोडीचे प्रयत्न सुरू होतील, असेही त्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान मोदी व इतर भाजप नेत्यांशी भेठीगाठी झाल्यानंतर मावळते मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना जणू आमदार खरेदी-विक्रीचा परवानाच मिळाला आहे, अशी टीकाही नितीश यांनी केली.

माझी चूकच झाली...
मी मुख्यमंत्रिपद सोडले तेव्हा मांझी यांना या पदी विराजमान करणे ही माझी चूकच होती, अशी कबुली नितीश यांनी दिली. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राजीनामा देण्याचा निर्णय योग्यच होता असा दावा करून उत्तराधिका-याची निवड मात्र चुकल्याचे ते म्हणाले.