आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीचा निर्णय सामान्‍यांच्‍या हिताचा, विरोधकांचा विनाकारण विरोध: नितीश कुमार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पटना- बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांनी उत्‍तरप्रदेशमधील विजयाबद्दल भाजपचे अभिनंदन केले असून पुन्‍हा एकदा नोटाबंदीच्‍या निर्णयाचे समर्थन केले आहे. नोटाबंदीचा निर्णय सामान्‍यांच्‍या हिताचा होता, असे ट्विट नितीश कुमार यांनी केले आहे. उत्तरप्रदेशसह पाच राज्यांमधील निवडणूक निकालांवर भाष्‍य करताना नितीशकुमार म्हणाले, मागासवर्गीयांनी उत्तरप्रदेशमध्ये भाजपला साथ दिल्‍याचे स्‍पष्‍ट दिसत आहे. इतर पक्ष मात्र या वर्गाला स्वतःशी जोडण्यात अपयशी ठरले.
 
पंजाबमधील विजयाबद्दल काँग्रेसला शुभेच्‍छा 
-नितीश यांनी ट्विट केले आहे की, 'पंजाबमाधील विजयाबद्दल काँग्रेसला शुभेच्‍छा. मणिपूर आणि गोवामध्‍ये सर्वात मोठा पक्ष बनल्‍याबद्दल काँग्रेसचे अभिनंदन.' 
-नितीश म्‍हणाले,'काँग्रेस-समाजवादी पक्षाच्‍या आघाडीला ज्‍याप्रमाणे बिहारमध्‍ये यश मिळाले त्‍याप्रमाणे उत्‍तरप्रदेशमध्‍ये ते यश मिळवू शकले नाही. बिहारप्रमाणे उत्‍तरप्रदेशमध्‍ये महाआघाडी होऊ शकली नाही.' 

विरोधकांचा नोटाबंदीला विरोध अनावश्‍यक: नितीश  
- भाजपच्‍या नोटाबंदीच्‍या निर्णयाचे समर्थन करताना नितीश कुमार म्‍हणाले, 'नोटाबंदीच्‍या निर्णयाला विरोधकांनी विनाकारण विरोध केला. वास्‍तविकत: हा निर्णय सामान्‍यांच्‍या हिताचा होता. यानिर्णयामुळे भ्रष्‍ट श्रीमंतांच्‍या संपत्‍तीवर टाच पडली. त्‍यामुळे विरोधकांची याबाबतची भूमिका सामान्‍यांना पटली नाही.'  
- जेडीयू नेता शरद यादव यांनीदेखील उत्‍तरप्रदेश व उत्‍तराखंडमधील विजयाबद्दल 
भाजपचे अभिनंदन केले आहे. 
- पंजाबमधील काँग्रेसच्‍या यशाबद्दल शरद यादव म्‍हणाले, 'पंजाबने काँग्रेसमध्‍ये चमकदार कामगिरी केली. यासाठी पंजाब काँग्रेसचे नेते कॅप्‍टन अमरिंदर सिंग आणि पंजाबच्‍या जनतेचे अभिनंदन.' 
बातम्या आणखी आहेत...