आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राने जातनिहाय आकडेवारी जाहीर करावी : नितीशकुमार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सामाजिक स्तर व आर्थिक निकषनिहाय लोकसंख्येची आकडेवारी एनडीए सरकार जाणूनबुजून प्रकाशित करत नाही. जातनिहाय लोकसंख्या असताना भाजप संकलित माहिती का सादर करत नाही, असा सवाल कुमार यांनी उपस्थित केला. जनतेला ही माहिती हवी असतानाही केंद्र असे का करत आहे? खुलासा देण्याची मागणी नितीश यांनी पत्रपरिषदेत केली. ‘जनता के दरबार में मुख्यमंत्री’ कार्यक्रमादरम्यान नितीश यांनी माध्यमांशी बातचीत केली.

पंतप्रधानांवर केली टीका
लोकसंख्येची दशकभरात जातनिहाय आर्थिक स्थिती काय? याचे उत्तर जनतेसाठी आवश्यक आहे. केंद्र सरकार माहिती दडवून फसवणूक करत आहे. निवडणुकांमध्ये भाजपचे नुकसान होऊ नये म्हणून माहिती दडवली जात असल्याचा आरोप नितीश यांनी केला. निवडणुकांदरम्यान पंतप्रधानांच्या जातीचा उल्लेख वारंवार करण्यात आला. त्याचा निवडणुकीसाठी फायदा करून घेतला. आता मात्र जातनिहाय लोकसंख्या विश्लेषण देणे सरकारला का खटकत आहे, असा प्रश्न नितीश यांनी विचारला.

अमित शहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी नरेंद्र मोदींच्या रूपाने देशाला पहिला आेबीसी पंतप्रधान लाभल्याचे नुकतेच म्हटले होते. विधानसभा निवडणुकांत आेबीसी मतांवर डोळा ठेवूनच शहा यांनी हे वक्तव्य केल्याचे कुमार म्हणाले.
लालूंच्या मोर्चाचे समर्थन
सोमवारी जातनिहाय लोकसंख्येची आकडेवारी जारी करण्याच्या मागणीसाठी राजद नेते लालूप्रसाद यादव राजभवनावर मोर्चा घेऊन जाणार आहेत. या आंदोलनाचे नितीश यांनी समर्थन केले. माहिती दडवण्याचे तर्कशुद्ध कारण सांगावे. जातवार माहितीमुळे अनुशेषाचे चित्र स्पष्ट होते.