आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitishkumar Opposing Modi Becaus Of Threat To Janta Dal Leaders Baba Ramdev

\'जनता दलातील नेत्यांना धोका असल्याने नितीशकुमारांचा मोदींना विरोध\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - योगगुरू बाबा रामदेव यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची जोरदार पाठराखण करत त्यांना ‘रॅम्बो’ संबोधल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदींचा उदय हा जनता दल नेत्यांसाठी धोका असल्यामुळेच नितीशकुमार मोदींना विरोध करत असल्याचे मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केले.

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या 15000 भाविकांची मोदींनी सुटका केल्याच्या वृत्तावर मी काही त्यांच्यासारखा ‘रॅम्बो’ नाही, अशी कोपरखळी नितीशकुमार यांनी मोदींना नुकतीच मारली होती. त्याबाबत पत्रकारांनी छेडले असता बाबा रामदेव यांनी ही प्रतिक्रिया दिली.

यूपीएच्या नेतृत्वाली भ्रष्ट व्यवस्था बदलण्यासाठी मागासतल्या मागास जातीतील कोणी तरी पुढे आले आहे, याचा खरे तर नितीशकुमारांना आनंदच वाटायला हवा होता, असे रामदेव म्हणाले. आपणही सामान्य सामाजिक पार्श्वभूमीतून आलो असून मागास आणि इतर मागासवर्गाने उपेक्षित समाजाच्या उत्थानासाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. 2014 च्या निवडणुकीत सक्रिय भूमिका बजावणार काय, असे विचारले असता आपण आधीच मैदानात उतरलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.