आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात ज्येष्ठ ब्रँड अॅम्बेसेडर होणार होते निजामुद्दीन, 116 व्या वर्षी बनवले होते मतदार कार्ड, पण मतदान करू शकले नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - ११६ व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे कर्नल निजामुद्दीन आतापर्यंत देशसेवेत सक्रिय होते. ते स्वातंत्र्याच्या आधीपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जवळचे सहकारी होते. पण स्वातंत्र्यानंतर देशसेवेची पद्धत बदलली होती. ते आझमगड आणि जवळपासच्या जिल्ह्यांत मतदारांकडून जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी जागरूक होते. प्रशासनाने या वर्षी त्यांचे व्होटर कार्डही बनवले. अर्थात मतदानाआधीच त्यांचे निधन झाले.

आझमगढच्या मुबारकपूर येथील ढकवां गावात सोमवारी कर्नल निजामुद्दीन यांनी अंतिम श्वास घेतला. दुपारनंतर गावातीलच कब्रस्तानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्ययात्रेत पोहोचलेले सर्व प्रशासकीय अधिकारी त्यांच्या देशासाठीच्या योगदानाचा उल्लेख करत होते. त्यांनी सांगितले की, मतदार जागरूकता मोहिमेसाठी प्रशासनाच्या प्रस्तावावर आपल्या आवाजात लोकांना आवाहन करण्यासाठी आनंदाने तयार झाले होते. आझमगढच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्याचा प्रस्तावही निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. तसे झाले असते तर बहुधा ते देशातील सर्वात ज्येष्ठ ब्रँड अॅम्बेसेडर ठरले होते.

... पण सरकारने नाही मानले ‘सेनानी’ : कर्नल निजामुद्दीन उर्फ सैफुद्दीन यांना स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जाहीर करण्यासाठी दीर्घ लढाई लढावी लागली. पण सरकारने त्यांना हे पद आणि पेन्शन देण्यास इन्कार केला. सरकारचे म्हणणे होते की, लक्ष्मी सहगल यांच्याकडून मिळालेल्या २००० लोकांच्या यादीत त्यांचे नाव नव्हते. त्याचबरोबर आझमगडच्या नोंदीत त्यांचे नाव सैफुद्दीन असे होते. कर्नल सांगत असत की, ते १९६९ मध्ये आझमगडला परत आले होते. पण सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना लपून राहण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांनी आपले खरे नाव जाहीर केले नाही.
 
आझाद हिंद सेनेत रंगूनमध्ये सामील झाले होते
कर्नल निझामुद्दीन सांगत की, ते नेताजींचे अंगरक्षक आणि चालक होते. ते लहानपणीच रंगूनला गेले होते. काही काळानंतर ते आझाद हिंद सेनेत सहभागी झाले आणि नेताजींचे विश्वासपात्र ठरले. नेताजींना म्यानमारच्या छितांग नदीच्या किनाऱ्यावर सोडून आलो होतो, असा दावा त्यांनी केला होता.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)