आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नेत्याच्या मुलास जामीन नाहीच, विकाससह दाेघांना 7 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- २९ वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात येथील न्यायालयाने मंगळवारी हरियाणा भाजपचे प्रमुख सुभाष बराला यांचा मुलगा विकास व त्याचा मित्र अाशिषकुमार यांचा जामीन फेटाळून लावला. या दाेघांना ९ अाॅगस्ट राेेजी अटक करण्यात अाली हाेती.

विकास (२३) व अाशिषकुमार (२७) या दाेघांनी मिळून एका वरिष्ठ अायएएस अधिकाऱ्याच्या मुलीचा पाठलाग करून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला हाेता. हा प्रकार ४ अाॅगस्ट राजी रात्री घडला हाेता. याप्रकरणी संबंधित तरुणीच्या तक्रारीवरून सुुरुवातीला दाेघांविरुद्ध जामीनपात्र व माेटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला हाेता. त्यामुळे नंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली हाेती. मात्र, नंतर ९ राेजी दाेघांना पुन्हा अटक करण्यात येऊन त्यांच्यावर कलम ३६५ व ५११नुसार पाठलाग व अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. याप्रकरणी मंगळवारी झालेल्या कामकाजात न्यायाधीश बरजिंदरपाल सिंग यांनी दाेघांना जामीन नाकारला. तसेच दाेघांची ७ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्यात अाली, असे बचाव पक्षाचे रवींद्र पंडित यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील तरुणीच्या समर्थनार्थ तसेच महिला व मुलींच्या संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात माेर्चे काढण्यात अाले हाेते. 
बातम्या आणखी आहेत...