आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Bikinis, No Pubs: Goa Minister\'s Formula For Women\'s Safety

महिलांच्या सुरक्षेसाठी गोव्याच्या मंत्र्यांचा फॉर्म्यूला; नो बिकनी - नो पब्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्या सुरात सुर मिसळत गोव्याचे ज्येष्ठ मंत्री सुबीन ढवळीकर यांनी महिलांनी स्वतःच्या सुरक्षीततेसाठी बीचवर बिकनीमध्ये येऊ नये आणि गोव्यात पब संस्कृती नको असे म्हटले आहे.
मुतालिक यांनी सोमवारी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, 'मुली आणि महिलांनी तोकड्या कपड्यांमध्ये पबमध्ये जाणे हे स्थानिक संस्कृतीच्या विरोधातील असून ते बंद झाले पाहिजे.'
सुबीन ढवळीकर यांनी मुतालिक काहीही चुकीचे बोलले नाही, असे म्हणत त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. ढवळीकर हे मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी असून ते महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते आहेत. सोमवारी त्यांनी तोकड्या कपड्यात पबमध्ये जाणे गोव्याच्या संस्कृतीला मारक असल्याचे म्हटले होते. हे असेच चालू राहिले तर, गोव्याची संस्कृती नष्ट होईल. हे बंद झाले पाहिजे असे ते म्हणाले.

आपल्या वक्तव्याच्या समर्थनार्थ आज एक वृत्तवाहिनीशी बोलताना ढवळीकर म्हणाले, 'अशी बंदी महिलांच्या दृष्टीनेच गरजेची आहे. त्यांच्या वैयक्तिक सुरक्षीततेसाठी त्यांनी बीचवर बिकनीमध्ये येऊ नये. त्यांनी खासगी ठिकाणी बिकनी घालण्याच्या मी विरोधात नाही.'
पबमधील ड्रेसकोडच्या समर्थनार्थ ढवळीकर म्हणाले, 'मुली शॉर्ट ड्रेस परिधान करुन पबमध्ये जातात. पब ही भारतीय संस्कृती नाही.'
मद्यपानाला विरोध करताना ढवळीकर म्हणाले, 'मद्यपानामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे आपल्या माता भगिणींना वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते. हे थांबले पाहिजे. गोवा हे मंदिर आणि चर्चचे शहर आहे. येथे पब टुरिझम फोफावू दिला जाणार नाही.'