आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा कृष्ण जन्माष्टमीला चायनीज सजावट नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा- कृष्ण जन्माष्टमीनिमित्त वृंदावनमध्ये यंदा चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील मंदिरांवर चायनीज लायटिंगही करण्यात येणार नाही, असे श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले. डोकलाममध्ये चिनी लष्कराच्या हालचाली वाढल्या आहेत. चीनने चालवलेल्या लष्करी हालचालींच्या विरोधात निषेध म्हणून मंदिरांचे पुजारी आणि श्रीकृष्ण सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. जन्माष्टमीला संत-महंत तसेच सर्वसामान्य लोकांनीही चायनीज वस्तूंवर बहिष्कार घातला, असे संस्थेचे सचिव कपिल शर्मा यांनी सांगितले. येत्या १४ ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात येत आहे. सिक्कीममधील डोकलाम भागात गेल्या ५० दिवसांपासून भारत-चीनदरम्यान तणाव निर्माण झाला आहे.

शासनानेही चायनीज वस्तूंच्या आयातीवर बंदी आणावी, अशी विनंती आम्ही सरकारला करणार आहोत, असे शर्मा यांनी सांगितले. या कृष्ण जन्माष्टमीपासून कोणीही चायनीज वस्तूंचा वापर करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...