आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करोग संशोधन; गायींचा गर्भपात नाही, संशोधनासाठी कोबंडीच्‍या अंडयातील सिरमचा वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - कर्करोग संशोधनासाठी आता गायींचा गर्भपात करण्याची गरज नाही. आतापर्यंत गायींच्या गर्भपाताने मिळणाऱ्या फिटल कॉफ सिरम (एफसीएम) ची गरज प्रयोगशाळा व ट्यूबच्या ट्रायलमध्ये असायची, पण आता ती कोंबड्यांच्या अंड्यांनी तयार होणारे सिरम पूर्ण करू शकेल.  
 
भारतीय संशोधक डॉ. परीक्षित बन्सल यांनी प्रयोगशाळेत चायनीज हँपसर्टन ओव्हेरियन सेल लाइन(सीएचओ) मध्ये याचा यशस्वी उपयोग केला आहे. तथापि, अंडे सायटोप्लानिक मॅट्रिक्स (ईसीएम) नावाच्या या सिरमची दुप्पट मात्रा उपयोगात येईल. यासाठी परीक्षितला पेटंट मिळाले आहे.
 
कोणतेही अँटी कॅन्सर ड्रग विकसित करण्यासाठी  इन व्हिट्रो टेस्ट असते. यात कॅन्सरच्या औषधांचा परिणाम मोजण्यासाठी प्रथम कर्करोगाच्या पेशी विकसित कराव्या लागतात. यास कर्करोग सेल लाइन म्हणतात. या कॅन्सर लाइनवर अँटी कॅन्सर ड्रग टाकले जाते. जर कर्करोगाच्या पेशी मरून गेल्या तर औषध परिणामकारक आहे. 

ही प्राथमिक चाचणी आहे, जी कोणत्याही औषधाच्या प्रभावी तपासणीसाठी गरजेची आहे. ही साखळी बनवण्यासाठी एफसीएमचा उपयोग होतो.  एफसीएम मिळवण्यासाठी गर्भवती गायीचा गर्भपात केला जातो. यातून मिळणाऱ्या रक्तातून तांबड्या आणि पांढऱ्या भागास वेगळे करून पांढऱ्या भागाचे सिरम बनविले जाते.
 
सध्या जगभरात. एफसीएमचे दुसरे अल्टरनेट आहे फॅटल बोवीन सिरम. हे गर्भवती गायीच्या नंतरच मिळते आहे. डॉ. बन्सल यांनी सांगितले की, एक दिवस ते स्वयंपाकघरात उभे होते. तेव्हा जवळच कबुतराचे घरटे पाहिले. त्यांनी कबुतराच्या अंड्यातून पिल्ले निघताना पाहिली. त्यानंतर अंड्यात सिरमशी मिळताजुळता पदार्थ होता. त्या वेळी ते नायपर मोहाली येथे संशोधक होते. येथूनच कल्पना मिळाली. शोध लागला. 

कॅन्सरची साखळी विकसित केली जाईल असे प्रयत्न का करू नयेत,जर यात एक संपूर्ण कबुतर डेव्हलप होऊ शकते, तर कॅन्सर सेलही विकसित होतील. असा विचार त्यांच्या मनात आला.त्यांनी पंजाब विद्यापीठाशी संपर्क साधला. तेथील प्रयोगशाळेत कॅन्सर सेल लाइन विकसित करण्याचे काम सुरू होते. एक सामान्य कोंबडीच्या अंड्यातून त्यांनी सिरम तयार केले आणि याचा उपयोग संशोधनासाठी केला. जिथे गायीच्या भ्रूणाने तयार सिरमला ५ टक्के टाकावे लागते, तेच यास १० टक्क्यात टाकावे लागले.
 
त्यांनी यासाठी पेटंट फाइल केले आणि २०१६ मध्ये त्यांना याचे पेटंट मिळाले. डॉ. बन्सल यांनी नोकरी सोडून दिली आणि आपले स्टार्टअप सुरू केले.  त्यांनी बायोटेक इग्निशन ग्रँटसाठी अर्ज केला आहे. ज्याच्या मदतीने तो प्रत्येक प्रकारच्या कर्करोग पेशी लाइनसारख्या कोलोन कर्करोग, नेत्र कर्करोग आदींवर यास टेस्ट करतील. पुढील दीड वर्षात ते यास बाजारात उतरवण्याच्या तयारीत आहेत. हे शास्त्रज्ञाला एफसीएमच्या स्पर्धेत अर्ध्याहूनही कमी किमतीत उपलब्ध करू शकतील वा होईल. 
 
बातम्या आणखी आहेत...