आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापमं : सीबीआय चौकशीबाबत हायकोर्टाचा आदेश नाही, उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/उज्जैन - मध्यप्रदेशच्या व्यापमं (व्यावसायिक परीक्षा मंडळ) घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यासंदर्भातील मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या अर्जावर हायकोर्टाने काहीही आदेश दिलेला नाही. बुधवारी चीफ जस्टीस जे.एम. खानवलकर आणि जस्टीस आलोक अराधे म्हणाले की, अशा प्रकारची याचिका सुप्रीम कोर्टातही दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत सुप्रीम कोर्टातच निर्णय होईल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि हे प्रकरण समोर आणणारे आशिष चतुर्वेदी, डॉ. आनंद राय आणि प्रशांत पांडेय यांच्या अर्जांवर सुप्रीम कोर्टात 9 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत हायकोर्टाला पत्र लिहून सीबीआय चौकशी करण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले होते. सध्या मध्यप्रदेश एसटीएफ या घोटाळ्याचा तपास करत आहे.

मंगळवारी पुन्हा चौकशी करण्याची घोषणा
उज्जैनचे पोलिस अधीक्षक मनोहरसिंह वर्मा यांनी नम्रता डामोर यांच्या मृत्यूची पुन्हा चौकशी केली जाणार असल्याची घोषणा मंगळवारीच केली होती. त्यासाठी डामोर यांच्या मृत्यूशी संबंधित फाइल पुन्हा उघडली जाणार आहे. पण त्याच्या 24 तासाच्या आतच पोलिसांनी सांगितले की, नम्रता यांच्या पोस्टमॉटर्म रिपोर्टमध्ये शंका घेण्यासारखे काहीही आढळले नसल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणाची फाईल बंद करत असल्याचेही सांगण्यात आले. पोलिसांनी 2012 मध्ये सर्वात आधी हत्येच्या अँगलने चौकशी केली. पण नंतर फाइल बंद करण्यात आली. नम्रताबरोबर बलात्काराचा प्रयत्न झाला आणि नंतर तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची शक्यताही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आली होती.
बातम्या आणखी आहेत...