आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विनाहेल्मेट प्रवेश बंदीसाठी खासगी संस्था सरसावल्या, विद्यार्थी- पालकांकडून शपथपत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - येथील खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये दुचाकीवर येणाऱ्या विद्यार्थ्यांनी हेल्मेट घातलेले नसेल तर त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. शहरातील सर्वच अभियांत्रिकी महाविद्यालयांनी या सत्रापासून विद्यार्थ्यांसाठी हेल्मेट अनिवार्य केले आहे. दुचाकीचालक विद्यार्थ्यांना प्रवेशद्वाराजवळच रोखण्यात येईल. विनाहेल्मेट विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. यासोबतच महाविद्यालयात होणारी फेअरवेल पार्टी व फ्रेशर्स पार्टीही महाविद्यालयाच्या परिसरात करण्याचे बंधन असून बाहेर हॉटेल्स वा इतरत्र या पार्ट्यांवर महाविद्यालयाचे संचालक निर्बंध आणतील.
तंत्रशिक्षण राज्यमंत्र्यांनी यासंबंधीचे आदेश महाविद्यालयांच्या संचालकांना दिले आहेत. तंत्रशिक्षण विभागाने दिलेल्या अहवालानंतर तंत्रशिक्षण राज्यमंत्री दीपक जोशींनी यासंदर्भात सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना वाहन परवाना व हेल्मेटविषयी काटेकोर नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले.

रस्ते अपघातात बळी जाणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता हे पाऊल उचलण्यात आले. गेल्या वर्षी २७ विद्यार्थ्यांचा बळी रस्ते अपघातात गेला. पैकी बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकीचे होते. असोसिएशन ऑफ टेक्निकल अँड प्रोफेशनल इन्स्टिट्यूटचे सचिव बी. एस. यादव यांनी सांगितले की, अभियांत्रिकी महाविद्यालये शहरापासून दूर असल्याने बरेच विद्यार्थी बसने येतात. १० ते १५ % विद्यार्थी खासगी वाहनांनी येतात. मात्र, असोसिएशन हेल्मेट सक्तीचे समर्थन करते व त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

खासगी संस्थांनी हेल्मेट सक्तीसाठी पुढाकार घेतानाच विद्यार्थ्यांच्या वाहन परवान्याची तपासणीदेखील शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशद्वारावरच केली जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी वाहन परवाना मिळवणे प्रत्येक दुचाकीधारक विद्यार्थ्यासाठी अनिवार्य झाले आहे. प्रशासनाने या निर्णयाचे स्वागत केले असून विद्यार्थ्यांच्या व तरुणांच्या बेफाम बाइक चालवण्यावर यामुळे नियंत्रण येईल, असे म्हटले आहे.

या संस्थांचा पुढाकार प्रशंसनीय
राजीव गांधी आैद्योगिक विद्यापीठ परिसरात विद्यार्थी व इतरांनाही हेल्मेटशिवाय प्रवेश दिला जात नाही. नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट विद्यापीठाने अपघाताची वाढती संख्या पाहता वसतिगृहातील विद्यार्थ्यांना खासगी वाहन वापरण्यास बंदी घातली आहे. विद्यार्थी व पालकांकडून विद्यापीठाने याविषयी शपथपत्र घेतले आहे. खासगी वाहन बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून काढून टाकले जाते. मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनेदेखील याच नियमाची अंमलबजावणी केली. शैक्षणिक संस्थेच्या परिसरात बाइकवर फिरण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...