आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनआयटीत जाण्यास अनुपम खेर यांना मनाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांना रविवारी राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयटी) परिसरात प्रवेश नाकारण्यात आला. कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे कारण देत त्यांना श्रीनगरच्या विमानतळावरच अडवण्यात आले. 'आपल्याला श्रीनगरात प्रवेश नाही,' असे पोलिसांनी म्हटल्याचे ट्विट त्यांनी विमानतळावरूनच केले.
दरम्यान, काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंह यांनी आश्वासन दिल्यानंतरही काश्मीरबाहेरील विद्यार्थ्यांचे उपोषण सुरूच आहे. खेर म्हणाले, मी एनआयटीत अडचणी निर्माण करण्यासाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांना भेटून त्यांना नैतिक पाठिंबा देण्यास जात होतो. या विद्यापीठात लाखो लोक जातात आणि ते सर्वांसाठी खुले आहे. मग मला का अडवण्यात आले? दरम्यान, पोलिसांनी आपल्याला वडिलोपार्जित घरी आणि गंदेर बलमधील खीर भवानी मंदिरातही जाऊ दिले नाही, असा अारोपही त्यांनी केला आहे. अनुपम खेर काश्मिरी पंडित अाहेत. श्रीनगरला रवाना होण्यापूर्वी खेर यांनी ट्विट केले होते की, मी माझ्या एका घरातून दुसऱ्या घरी एनआयटी श्रीनगरमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची गळाभेट घेणार आहे. त्यांना भेटवस्तूही देणार.