आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खायला झाडपाला, प्यायला गढूळ पाणी... कसेबसे जगणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवभूमीतील महाप्रलयाला आठ दिवस झाले. चित्र अजूनही भीषण आहे. केदारनाथ घाटावर मृतदेह विखुरलेले आहेत. अमेरिकेने अणुबॉम्ब टाकल्यानंतर हिरोशिमाची झाली अगदी तशीच अवस्था आहे. तवाघाट, गौरीगाव असो की मुंडकटिया, चंद्रापुरी... डोंगरद-या, नद्यांमध्ये जागोजाग मृतदेह दिसत आहेत. झाडांची पाने खाऊन गढूळ दूषित पाणी पिऊन लोक कसेबसे जिवंत आहेत.


महाराष्‍ट्रातील दिव्या गुरव व त्यांचा मुलगा जयंत यांनी कथन केलेले वास्तव भीषण आहे. जंगलात पावसामुळे हुडहुडी भरत आहे. जीव वाचवण्यासाठी मृतदेहांचे कपडे काढून घालावे लागले. दिल्लीचे विजय मक्कड यांचे दु:ख डोंगरापेक्षा मोठे आहे. बचाव पथकाने त्यांना गौरीकुंडहून गुप्तकाशीत आणले. मुसळधार पावसामुळे पत्नी व मुलाला त्यांनी मंदिरात पाठवले. काही क्षणांत मंदिरच कोसळले. दोघेही गाडले गेले. पथकांचे लक्ष सध्या जिवंत लोकांना वाचवण्याकडे आहे. त्यामुळे दोघांचे मृतदेहही त्यांना पाहता आले नाहीत. लहेरिया सरायचे (बिहार) 72 वर्षीय श्यामबाबू साह 26 लोकांसोबत यात्रेला गेले होते. त्यांची पत्नी, मुलगा व नातवासह 8 जण वाहून गेले. ते कसेबसे वाचले. जंगलातून रात्री 2 वाजता बाहेर पडत असताना शेकडो मृतदेह पडलेले होते. दलदलीतून बाहेर पडण्यासाठी 300 मृतदेह अंथरून त्यांनी मार्ग काढला. केदारनाथमधील मृतांवर सोमवारी तेथेच अंत्यसंस्कार होणार आहेत.