आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता बंगाली पत्रकाराचा अजूनही शोध लागेना; अलिपूरद्वार बंदला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलिपूरद्वार- महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेत लाचखोरी केल्याचे रॅकेट उघड करणाऱ्या पत्रकाराचा अद्यापही छडा लागलेला नाही. छायन सरकार या पत्रकाराने लाचखोरी प्रकरण स्थानिक दैनिकाद्वारे उघड केले होते. त्यानंतर राहत्या घराजवळ त्यांचे अपहरण झाले. अपहरत पत्रकाराची शोधमोहीम सीआयडीकडे असून अद्याप त्याचा माग शोध लागला नाही. मुख्यमंत्र्यांनी छायन यांच्या शोधासाठी ३५ सीआयडी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा चमू नियुक्त केला आहे. अलिपूरद्वार येथील छायन सरकार यांच्या घराचा परिसरही पिंजून काढण्यात आला.

दबाव वाढला
दरम्यान, प्रेस क्लबने हे अपहरणच असल्याचा दावा केला होता. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी गेल्या १२ तासांपासून बंदचे आवाहन केले आहे. या बंदला भाजप व डाव्या पक्षांनीही पाठिंबा दिला असून पत्रकाराच्या अपहरणाचा व्यापक निषेध नोंदवला जात आहे. अलिपूरद्वार येथे सर्व खासगी आस्थापना, खासगी वाहतूक, शैक्षणिक संस्था, दुकाने, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. लोकांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने तपास यंत्रणेवरील दबाव वाढत आहे. सरकारी कार्यालयातही उपस्थिती रोडावल्याचे चित्र होते.