आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्लामिक बँकेचा विचार नाही : नक्वी; काँग्रेसने अधिवेशन सुरळीत पार पडू द्यावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- देशातील जनतेची आर्थिक गरज भागवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात बँकिंग सेवेचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे मुस्लिम समुदायासाठी स्वतंत्र इस्लामिक बँकिंगचा सरकारचा विचार नाही, असे केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी स्पष्ट केले आहे.  


इस्लामिक किंवा शरियानुसार बँकिंग सेवा दिली जाते. तेव्हा त्या व्यवस्थेनुसार कोणताही कर लावला जाऊ शकत नाही. भारतात सरकार इस्लामिक बँकिंगला परवानगी देऊ शकत नाही. कारण भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. देशात लोकशाही आहे. त्याशिवाय देशात विविध प्रकारच्या शेड्युल्ड बँकांचीदेखील व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे समुदायासाठी स्वतंत्र बँकेची गरज वाटत नाही. काहींनी अशा प्रकारची बँक व्यवस्था सुरू करण्याचा अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी सल्ला दिला आहे. परंतु सरकारचा तसा उद्देश नाही, असे  नक्वी यांनी सांगितले. ते वृत्तसंस्थेशी बोलत होते.  


तेलंगणा सरकारचा कोटा म्हणजे ‘लॉलिपॉप ’

तेलंगणा सरकारने मुस्लिमांसह मागास वर्गातील समुदायाला देऊ केलेला कोटा म्हणजे लॉलिपॉप असल्याची टीका नक्वी यांनी केली. कोणतेही आरक्षण हे घटनेच्या चाैकटीत राहूनच दिले जाऊ शकते. तेलंगणा सरकारने एप्रिलमध्ये मंजूर केलेले विधेयक अशाच प्रकारचे दिशाभूल करणारे आहे. तेलंगणाच्या नवीन नियमानुसार अनुसूचित जमाती व मागास वर्गाचा कोटा वाढवण्यात आला आहे. सरकारी नोकऱ्या व शिक्षणात आरक्षण मिळेल. त्यात मुस्लिमांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यघटना परवानगी देत नसेल तर आरक्षण वैध ठरू शकत नाही, असे नक्वी यांनी म्हटले आहे. नक्वी यांच्याकडे पूर्वी देखील इस्लामिक बँक सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती.  

 

काँग्रेसने अधिवेशन सुरळीत पार पडू द्यावे  
आगामी हिवाळी अधिवेशन निर्विघ्न पार पडावे. त्यापूर्वी आम्ही काँग्रेससह सर्व पक्षांसोबत चर्चा करणार आहोत. अधिवेशनादरम्यान सरकार सर्व प्रकारच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. परंतु सभागृहाचे कामकाज सुरळीत होणे आवश्यक आहे. मात्र काही पक्षांना चर्चेऐवजी गोंधळात रस असतो. त्याचा परिणाम कामकाज व्यर्थ जाते, असे नक्वी यांनी एका प्रश्नावरील उत्तरात सांगितले.

बातम्या आणखी आहेत...