आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Jobs Early Retired Person Family Member In Railway Department

ऐच्छिक निवृत्ती घेतल्यानंतरही कुटुंबातील सदस्याला रेल्वेत नोकरी नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - एखाद्या कर्मचार्‍याने ऐच्छिक निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याची 2004 पासूनची रेल्वे खात्यातील पद्धत बंद करण्यात येत आहे. ही पद्धतच घटनाबाह्य असल्याचे निरीक्षण नोंदवून ती दोन महिन्यांत देशपातळीवर रद्द करण्याचा आदेश केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाने (कॅट) दिला आहे.


दोन महिन्यांत या आदेशाचे पालन करावे असे आदेश देताना कॅटचे सदस्य के. बी. सुरेश आणि प्रशासकीय सदस्य अनिलकुमार यांच्या पीठाने अलवर येथील गनी खान व सुलेमान खान यांचे अर्ज फेटाळून लावले. हा प्रकार घराणेशाहीसारखा असल्याचे पीठाने म्हटले आहे. खान यांनी आपल्या निवृत्तीच्या मोबदल्यात मुलांना रेल्वे खात्यात नोकरी देण्यात यावी, अशी विनंती अर्जात केली होती.


रेल्वे खात्यात 2004 पासून ही योजना एकूण 18 पदांसाठी सुरू आहे. या सर्व पदांच्या र्शेणीत येणारा कर्मचारी स्वच्छेने निवृत्त झाला तर त्यांच्या मुलांना थेट नोकरीत घेतले जात आहे.