आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Medicine Without Prescription News In Marathi

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय यापुढे औषधी मिळणे बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झालावाड - एक मार्चपासून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी मिळणे बंद करण्यात आले आहे. एच-1 श्रेणीतील 46 औषधांसाठी डॉक्टरांची शिफारस लागणार आहे. त्यात झोपेच्या गोळ्या, अधिक क्षमतेच्या अँटिबायोटिक गोळ्यांचा समावेश आहे. तशी सूचना सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (डीसीजीआय) देशभरातील मेडिकल स्टोअर्स व डॉक्टरांना जारी केली आहे.

मेडिकल स्टोअर्सच्या मालकांना अँटिबायोटिक औषधी खरेदी करणार्‍या व्यक्तीचे आणि डॉक्टरांचे नाव व पत्तादेखील नोंदवून ठेवावा लागणार आहे. नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व मेडिकल स्टोअर्समध्ये एक वेगळे रजिस्टर ठेवले जाणार आहे. त्यासाठी दररोज विकल्या जाणार्‍या अँटिबायोटिक औषधीची नोंद ठेवावी लागणार आहे. एच-1 श्रेणीतील हृदयरोग, टीबी, किडनीच्या उपचारासाठी वापरण्यात येणार्‍या अँटिबायोटिक तसेच व्यसनाधीन करणारी आणि निद्रानाशावरील गोळ्यांच्या खरेदीवेळीदेखील अशा प्रकारची खबरदारी घेणे यापुढे मेडिकल दुकानदारांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. त्यात डोरीपेनम, पेंटाजोसिन, हायड्रो क्लोराइड, मॅक्सिलोक्सारिन, ट्रोमाडोल, जोलपीडेम, अल्प्राजोलम इत्यादी औषधांना त्यात समाविष्ट करण्यात आले आहे.

डॉक्टरांवर निगराणी
डीसीजीआयने 6 महिन्यांपूर्वी कायद्यात दुरुस्ती केली होती. त्याची अंमलबजावणी 1 मार्चपासून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व मेडिकल स्टोअरवर त्यासाठी स्वतंत्र नोंद करण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे औषधी लिहून देणार्‍या डॉक्टरांवर या प्रक्रियेतून निगराणी ठेवली जाणार आहे. अर्थात प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी यापुढे मिळणार नाही.
अजय जैन, ड्रग कंट्रोलर, राजस्थान

लाल रंगाचे लेबल
एच-1 श्रेणीतील औषधींचे लेबलिंग वेगळ्या प्रकारे करण्यात येणार आहे. या औषधींमध्ये लाल रंगात आरएक्स असे लिहिलेले असेल. त्याशिवाय मद्य-सिगारेटप्रमाणे पाकिटावर इशारादेखील देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या औषधींची नोंदणी दोन वर्षांपर्यंत ठेवावी लागणार आहे. या काळात औषधी निरीक्षक केमिस्ट शॉपची केव्हाही तपासणी करू शकतो.

आरएमपीचा फायदा नाही
सरकारकडे नोंदणी असलेल्या डॉक्टरांची चिठ्ठी असेल तरच औषधी देण्याची परवानगी नवीन कायद्याने दिली आहे. त्यामुळे केमिस्टला आरएमपीच्या चिठ्ठीलादेखील वैध मानता येणार नाही, असे औषधी निरीक्षक नरेंद्रकुमार राठोड यांनी सांगितले. त्यात 46 प्रकारच्या औषधींचा समावेश आहे.