आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीतील एका शाळेत राष्ट्रगीत गायनाची परवानगीच नाही;12 वर्षांपासून परंपरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद- उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये बघाडा भागातील एका शाळेने स्वातंत्र्यदिनी राष्ट्रगीत म्हणण्याची परवानगी दिलेली नाही. त्याच्या निषेधार्थ शाळेच्या प्राचार्यांसह आठ शिक्षकांनी राजीनामा दिला. एम. ए. काॅन्व्हेंट स्कूलचे व्यवस्थापक झिया-उल-हक यांनी सांगितले की, ‘राष्ट्रगीतातील ‘भारत भाग्य विधाता’च्या ‘भारत’ या शब्दाला आमचा आक्षेप आहे. भारत आमचा भाग्यविधाता कसा होऊ शकतो? आमचा भाग्यविधाता तर फक्त ईश्वरच आहे. त्यामुळे आम्ही शाळेत राष्ट्रगीत गायनाची परवानगी देऊ शकत नाही. हे आमच्या मुस्लिम धर्माच्या विरोधात आहे.’

त्यावर शाळेच्या प्राचार्यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही स्वातंत्र्य दिनानिमित्त व्यवस्थापनाकडे राष्ट्रगीतासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची परवानगी मागितली होती; पण शाळेच्या स्थापनेनंतर आजपर्यंत १२ वर्षे राष्ट्रगीत गायन झाले नाही, हे माहीत झाल्याने आम्हाला धक्का बसला.’त्यावर जिल्हा शिक्षण निरीक्षक म्हणाले, आधी शाळेच्या मान्यतेची चौकशी करू. शाळेत ३०० मुले आहेत.

‘राष्ट्रविरोधी घटकांना खतपाणी’
या प्रकरणात कडक कारवाईची मागणी करत भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपने म्हटले आहे की, समाजवादी पक्ष मतपेढीचे राजकारण करून राष्ट्रविरोधी घटकांना खतपाणी घालत आहे. या शाळेला सरकारच्या एका मंत्र्याचा पाठिंबा आहे. १२ वर्षांपासून एका शाळेत राष्ट्रगीत म्हणू दिले जात नाही हे लज्जास्पद आहे.
बातम्या आणखी आहेत...