चंदिगड - भाजपचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धूने आपण राजकीय पक्ष स्थापन करणार नाही आणि पंजाब विधानसभेची निवडणूकही लढवणार नाही, अशी घोषणा बुधवारी केली. सरकारविरोधी मतांचे आपणास विभाजन करायचे नाही आणि ‘बिघडवण्याचा खेळ’ खेळायचा नाही, असे कारण सिद्धूने दिले आहे. काही दिवसांपूर्वीच सिद्धूने भाजपचा राजीनामा देत ‘आवाज- ए- पंजाब’ नावाच्या आघाडीच्या स्थापनेची घोषणा केली होती.