आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Novelty Of Congress\'s Gossip On Development, Narendra Modi Critise

काँग्रेसच्या विकास गप्पा, त्यात नावीन्य नाही; नरेंद्र मोदींची टीका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्लम - काही जण भारताच्या समग्र विकासाबाबत गप्पा मारत आहेत. मात्र संत, ऋषी-मुनींनी शेकडो वर्षांपासून हा संदेश दिला आहे, त्यामुळे देशासाठी ही नवी बाब नाही, अशी टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी कॉँग्रेसचे नाव न घेता केली. धार्मिक गुरू अमृतानंदमायी यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते.


मोदी म्हणाले, देशातील परंपरा व तत्त्वज्ञानाच्या बळावर भारत सुपर पॉवर म्हणून उदयास येऊ शकतो. प्राचीन भारतातील ऋषींनी ‘लोक समस्थ सुखीनो भवंतू’(सर्व जग आनंदी असावे) हा संदेश दिला आहे. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनाही या संदेशाप्रमाणे राज्यकारभार करण्याची त्यांनी शिकवण दिली. तत्पूर्वी कॉँग्रेसचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी माहितीचा अधिकार कायदा व सोशल मीडियाचा वापर करावा, असा सल्लाही मोदी यांनी कार्यकर्त्यांना दिला. निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा तापणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यावर भर द्यावा.