आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • No One Identify U Lala Girl Vidya Balan In Gopalkheda Village Lucknow Uttar Pradesh

विद्या बालनला ओळखत नाही या गावातील लोक, शाळकरी मुलांनी सांगितले हे नाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अॅक्ट्रेस विद्या बालन बुधवारी मोहनलालगंज तालुक्यातील गोपालखेडा येथे आली होती. - Divya Marathi
बॉलिवूड अॅक्ट्रेस विद्या बालन बुधवारी मोहनलालगंज तालुक्यातील गोपालखेडा येथे आली होती.
लखनऊ - 'डर्टी पिक्चर' नंतर संपूर्ण जग 'ऊ ला ला' गर्लच्या प्रेमात पडले होते. मात्र एक गाव असेही आहे जे विद्या बालनला ओळखत नाही.  फक्त लहानगेच नाही तर थोरा-मोठ्यांनाही 'ती' माहित नाही. उत्तर प्रदेशातील एका गावात जेव्हा इंग्रजी शिकवण्यासाठी अभिनेत्री विद्या बालन आली तेव्हा तिला पाहून सर्व विद्यार्थी 'शांती दीदी' म्हणून ओरडत होते. 
 
- लखनऊमधील मोहनलालगंज तालुक्यातील गोपालखेडा गावात बुधवारी विद्या बालन आली होती. शाळेतील मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी विद्या आली होती. मुलांनी पाहुणे येणार म्हणून त्यांच्यासाठी स्वागतगीतही तयार केले होते. 
- विद्यार्थ्यांना जेव्हा विचारले, की कोण येणार आहे. तेव्हा ते म्हणाले की कोणी तरी येणार आहे. मात्र कोण येणार आहे, हे काही ते सांगू शकले नाही. 
- गावातील एका वृद्ध महिलेने सांगितले की एवढी तयारी तर एखादा नेता येणार असेल तरच केली जाते. कदाचित मुख्यमंत्री येणार असतील. 
- पत्रकारांनी जेव्हा विद्यार्थ्यांना जाहिरात फलकावरील विद्याच्या फोटोकडे इशार करत विचारले तेव्हा देखील विद्यार्थी अभिनेत्रीचे नाव सांगू शकले नाही. 
- गावातील ज्या घरांमध्ये टीव्ही आहे, त्या घरातील काही मुले मात्र विद्याला शांती दीदी म्हणून ओळखत होते. जेव्हा त्यांना विचारले कोण शांती दीदी तर, ते म्हणाले, 'ही दीदी टीव्हीवर तेलाची जाहिरात करते.'   
- प्राथमिक शाळेतील मुलांनी सांगितले, की एक मिस मुंबईवरुन येणार आहेत आणि आम्हाला इंग्रजी शिकवणार आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गावातील चिखल-मातीच्या रस्त्यावर कशी चालली विद्या...
बातम्या आणखी आहेत...