आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅकेज नको, हवा स्वतंत्र तेलंगणा; आंध्रातील मंत्र्यांची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - स्वतंत्र तेलंगणाच्या बदल्यात आर्थिक पॅकेज देण्याच्या हालचालींवर आंध्र प्रदेशातील मंत्र्यांनी सडकून टीका केली आहे. आम्हाला स्वतंत्र तेलंगणाच हवा; पॅकेज नको, अशी एकमुख मागणी या मंत्र्यांनी केली आहे. कॉँग्रेस पक्षश्रेष्ठी स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीवर उपाय म्हणून ‘विशेष आर्थिक व राजकीय पॅकेज’ देण्याच्या प्रयत्नात असल्याचे वृत्त आहे.

पक्षश्रेष्ठींची ही कृती पक्षाला घातक ठरेल, अशी भीती नाराज मंत्र्यांनी व्यक्त केली. डी. श्रीधर बाबू, डी. के. अरुणा, दानम नागेंदर आणि व्ही. सुनीता लक्ष्मी रेड्डी या मंत्र्यांनी पक्षश्रेष्ठींच्या संभाव्य प्रस्तावाला उघड विरोध केला असून स्वतंत्र तेलंगणाशिवाय अन्य कोणताही पर्याय मान्य नसल्याचे त्यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांना सांगितले. स्वतंत्र राज्य अस्तित्वात येत नसेल तर एवढ्या वर्षांच्या आंदोलनाचा काय उपयोग? स्वतंत्र तेलंगणाला मंजुरी न दिल्यास हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येईल, असे ते म्हणाले. तेलंगणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी केंद्र सरकार या महिनाअखेरीस आंध्रासाठी स्वतंत्र पॅकेज देण्याच्या तयारी असल्याचे वृत्त आहे.