आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीशना नेपाळला जाण्यास केंद्राची मनाई, बिहारमध्ये जद नेते भडकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नेपाळ दौ-यावर जाऊ नये, असा सल्ला परराष्ट्र खात्याने दिल्याने संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) खासदार संतप्त झाले आहेत. हा विषय संसदेत मांडून केंद्र सरकारविरुद्ध मोर्चा उघडण्याची तयारी या खासदारांनी चालवली आहे.
कुमार शनिवारी नेपाळमधील भूंकपग्रस्त जनकपूरचा दौरा करणार होते. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना या दौ-यासाठी परवानगी देण्यास नकार दिला. प्रारंभी कुमार यांना जनकपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु, ऐनवेळी परराष्ट्र मंत्रालयाने बिहारच्या मुख्य सचिवांना दूरध्वनीवरून परवानगी नाकारण्यात आल्याचे कळवले.

जेडीयूचे खासदार के. सी. त्यागी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः नितीश कुमार यांच्याशी भूकंपाबाबत चर्चा केली. ते दोघे गेल्या काही दिवसांपासून समन्वयाने काम करीत होते. आता संसदेत हा मुद्दा उपस्थित केल्यावरच याबाबतचा खुलासा होईल. कुमार यांच्या जनकपूर दौ-याचा कार्यक्रम नेपाळ सरकारला कळवण्यात आला होता. त्या सरकारचाही काही आक्षेप नव्हता. मग केंद्र सरकारला काय आक्षेप आहे, असा प्रश्न त्यागी यांनी उपस्थित केला.
दरम्यान, नीतिश यांनी मात्र या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. प्रदेश प्रवक्ते संजय सिंह यांनीही केंद्रावर हल्लाबोल केला असून भाजप नीच पातळीवर राजकारण करत असल्याचे त्यांनी म्हटले. कुमार नेपाळ दौ-यावर गेले तर त्यांना प्रसिद्धी मिळेल व त्याचा राजकीय लाभ बिहारमध्ये होऊ शकतो, या भीतीपोटी भाजप व केंद्र सरकारने मुद्दाम त्यांना नेपाळ दौ-याची परवानगी नाकारली असल्याचेही सिंह यंाचे म्हणणे आहे.