आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Planing To Issue Ordinace For Gay Sex Relation Sushilkumar Shinde

समलैंगिकतेवर तूर्त वटहुकूम काढण्‍याचे नियोजन नाही - सुशीलकुमार शिंदे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू - समलैंगिकतेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल फिरवणारा वटहुकूम सध्याच काढण्याचे नियोजन नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. प्रौढांमधील सहमतीचे समलैंगिक संबंध गुन्हा नव्हे, हा दिल्ली हायकोर्टाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्दबातल ठरवला होता.
समलिंगी संबंधांच्या मुद्दय़ावर केंद्र वटहुकुमाचा मार्ग काढणार काय, असे विचारले असता केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, सध्याच नाही. आमच्या पक्षाचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष या मुद्दय़ावर यापूर्वीच बोलले आहेत. मी त्यांच्याशी सहमत आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. व्यक्तिगत स्वातंत्र्याचे हे प्रकरण असल्याचे मला वाटते. हायकोर्टाच्या निर्णयाशी मी सहमत आहे, असे राहुल यांनी म्हटले होते.