आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Proposal For To Increasing Subsidised LPG Cylender Numbers Moiley

अनुदानित सिलिंडरसंख्येत वाढीचा प्रस्ताव नाही - मोईली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोची - सबसिडीवरील सिलिंडरची संख्या वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्रापुढे नाही, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी शनिवारी स्पष्ट केले. तत्पूर्वी, सिलिंडरची संख्या 9 वरून 12 वर नेण्याचा सरकार विचार करेल, असे अर्थमंत्री पी. चिदंबरम म्हणाले होते.
यावर अद्याप तरी सिलिंडर संख्या वाढवण्याचा प्रस्ताव नाही, असे मोईलींनी पेट्रोनेट एलएनजी कंपनीच्या नव्या टर्मिनलच्या लोकार्पण सोहळ्यात सांगितले. 9 अनुदानित सिलिंडरचा 90 टक्के ग्राहकांना लाभ होतो आहे. केवळ 10 टक्के ग्राहकच सबसिडीपासून वंचित राहत असल्याची माहिती त्यांनी दिली.