आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Proposal To Hike Rail Fares, Says MoS For Railways Manoj Sinha

रेल्वे बजेटमध्ये प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - रेल्वे भाडेवाढ करण्याचा सध्या कोणताच प्रस्ताव नसल्याचे रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी म्हटले आहे. येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी ही बाब सांगितली. २६ फेब्रुवारी रोजी आगामी रेल्वे अर्थसंकल्प आहे.

रेल्वेमध्ये मोठी गुंतवणूक होण्याची आशा सिन्हा यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, रेल्वेच्या खासगीकरणाचा मुद्दा अधूनमधून उचलला जातो. गुंतवणुकीची आवश्यकता आहे. मात्र रेल्वेचे खासगीकरण केले जाणार नाही. विशेष म्हणजे, रेल्वेच्या विविध विभागांत रालोआ सरकारने १०० टक्के विदेशी गुंतवणुकीस परवानगी दिली आहे. अलीकडच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या संख्येत आठपट आणि माल वाहतूक सातपट वाढली आहे. मात्र, पायाभूत सुविधेत दुप्पट वाढ झाली. हे अंतर कमी करण्यासाठी चार-पाच वर्षांत केल्या जाणार्‍या कामाच्या आराखड्यावर विचार केला जात आहे.

भाडे कमी होणार नाही : डिझेलचे दर कमी झाले तरी रेल्वे भाड्यात कपात होणार नसल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले होते. प्रवाशांवर होणार्‍या खर्चाच्या निम्मा खर्च रेल्वे घेते. रेल्वे प्रवाशांना आधीपासून बरीच सबसिडी मिळत आहे. या क्षेत्रातील मागणी आणि पुरवठ्यात खूप अंतर आहे. ते भरून काढण्यासाठी भांडवलाची आवश्यकता आहे. लोकांना खुश करण्याऐवजी रेल्वेची स्थिती सुधारण्यावर भर देणार असल्याचे प्रभू म्हणाले.
आहे.

जून २०१४ मध्ये भाडेवाढ
ही भाडेवाढ २५ जूनपासून लागू झाली होती. प्रवासी भाड्याच्या सर्व श्रेणीत १४.२ टक्के वाढ झाली होती. माल भाडे ६.५ टक्के वाढले होते. यातून सरकारला चालू आर्थिक वर्षात आठ हजार कोटी रुपये जास्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज होता. त्यामुळे रेल्वेची तूट कमी होणार होती.