आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून 7 विमानतळांवर हँडबॅगवर सुरक्षा मोहर नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई येथील विमानतळांवर गुरुवारपासून प्रवाशांच्या हँडबॅग टॅगवर सुरक्षा मोहर लागणार नाही. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) महासंचालक ओ. पी. सिंह यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सिंह म्हणाले की, प्रवाशांचा प्रवास सोपा आणि सुविधाजनक करण्याच्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे. हा प्रयोग १५ डिसेंबरपासून २२ डिसेंबरपर्यंत चालेल. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला राहिला तर इतर विमानतळांवरही तो लागू होईल. सीआयएसएफ १९९२ पासून बॅगेज टॅगवर मोहर लावण्याचे काम करत आहे. सध्या फक्त भारतातच तसे केले जाते. पुढील टप्प्यात बोर्डिंग पासवरही मोहर लावण्याचे काम बंद केले जाईल.

एक प्रवासी-एक बॅगवर विचार सुरू : सिंह यांनी सांगितले की, ‘एक प्रवासी-एक बॅग’चा नियम लागू करण्याबाबतही गंभीरपणे विचार सुरू आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू असलेली ‘फुल बॉडी स्कॅनर’ यंत्रणा लवकरच देशातील इतर मोठ्या विमानतळांवरही लागू केली जाईल. ‘फुल बॉडी स्कॅनर’मधून जाणाऱ्या प्रवाशाला तपासणीसाठी फक्त ४ सेकंदांचा वेळ लागतो.
बातम्या आणखी आहेत...